३० कोटींच्या रोडवर खड्डे
By Admin | Updated: July 18, 2016 01:02 IST2016-07-18T00:46:45+5:302016-07-18T01:02:46+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ३० कोटींतून (एमएसआरडीसी) बांधलेल्या पैठण लिंकरोडवर सध्या खोलवर खड्डे पडले आहेत.

३० कोटींच्या रोडवर खड्डे
येणेगूर : लोहारा तालुक्यातील भोसगा तलावात खून करून टाकलेला इसम आळंद तालुक्यातील व्हनाळी (जि़ गुलबर्गा, कर्नाटक) येथील असल्याचे मुरूम पोलिसांच्या तपासात समोर आले आहे़ पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली असून, मुरूम पोलिसांनी तीन दिवसात खुनाच्या प्रकरणाचा छडा लावला आहे़
लोहारा तालुक्यातील भोसगा तलावाच्या शिवारात १४ जुलै रोजी एका अनोळखी युवकाचा खून केल्याचा प्रकार समोर आला होता़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ या प्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूम ठाण्याचे पोउपनि आऱए़मोमीन यांच्यासह गोरख शिंदे, अंजुम शेख यांनी मयत इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला होता़ राज्यातील विविध पोलीस ठाण्यांसह कर्नाटकातील पोलिसांना या प्रकरणाची माहिती देवून घटनास्थळावरील फोटोही पाठविण्यात आले होते़
कर्नाटक पोलिसांच्या मदतीने मुरूम पोलिसांनी या प्रकरणात तुकाराम शांताप्पा कोगणुरे (वय-२१ रा़ नेल्लूर ता़ आळंद जिग़ुलबर्गा) याला जेरबंद केले आहे़ तर मयत इसम हा व्हनाळी (ता़आळंद) येथील नटराज बाबुराव हात्तुरगे (वय-२१) हा असल्याचे समोर आले आहे़ तुकाराम कोगणुरे याचे लग्न व्हनाळी येथील मुलीशी झाले होते़ त्यामुळे नटराज हात्तुरगे हा कधी-कधी नेल्लुर गावाला येत होता़ तुकाराम कोगणुरे याला नटराजचा संशय आल्याने त्याने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार तुकाराम याने १२ जुलै रोजी नटराजला फोन करून पाहुण्याच्या गावाला जायचे आहे म्हणून आळंद येथे बोलावून घेतले़ दोघे दुचाकीवरून उमरगा चौरस्त्यावर आले़ तेथे दारूची बाटली, मटण पार्सल घेवून ते तेथून निघाले़ भोसगा शिवारात दोघांनी दारू पिली़ नटराजला अधिक दारू पाजून तुकाराम याने त्याचे हात बांधून पोटात चाकूने सपासप वार केले़ तसेच चेहरा ओळखू येवू नये म्हणून दगडाने तोंडावर मारहाण करून तेथून पळ काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़
दरम्यान, मुरूम पोलिसांनी खून प्रकरणाचा तीन दिवसात छडा लावून एकाला अटक केल्याने या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे़ (वार्ताहर)
मुरूम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मयताची छायाचित्रे राज्यासह कर्नाटकातील पोलिसांना पाठविली होती़ आळंद ठाण्यात नटराज बाबुराव हात्तुरगे हा हा हरवल्याची नोंद होती़ घटनास्थळावरील छायाचित्रे पोलिसांनी नटराजच्या नातेवाईकांना दाखविल्यानंतर त्यांनी मयत इसम हा नटराज असल्याचे समोर आले़ मुरूम पोलिसांनी त्यानंतर तपास करून कर्नाटक पोलिसांच्या मदतीने तुकाराम कोगणुरे याला अटक केली़