माविकसंचे असहकार आंदोलन स्थगित

By Admin | Updated: June 11, 2017 00:29 IST2017-06-11T00:26:55+5:302017-06-11T00:29:42+5:30

नांदेड : महावितरणचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे आणि अधीक्षक अभियंता आर. आर. कांबळे यांच्या सकारात्मक अश्वासनानंतर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.

Postponement of the Civil disobedience movement | माविकसंचे असहकार आंदोलन स्थगित

माविकसंचे असहकार आंदोलन स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महावितरणचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे आणि अधीक्षक अभियंता आर. आर. कांबळे यांच्या सकारात्मक अश्वासनानंतर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.
चुकीने केलेले निलंबन रद्द करण्यासाठी बिलोलीचे उपकार्यकारी अभियंता एस. एम. नरवाडे यांनी आणि चुकीची नियुक्ती रद्द करुन योग्य नियुक्ती मिळविण्यासाठी भोकर विभागातील शेख फारुख शेख खाजा या दोघांनी ८ जूनपासून विद्युतभवनसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.
त्यांच्या उपोषणास माविकसंने ९ जून रोजी द्वारसभा व १० जून रोजी असहकार आंदोलन जाहीर केले होते. मात्र याबाबत महावितरणने दखल घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
माविकसंचे प्रकाश वागरे, एस.बी.बुक्तरे, भीमराव सोनकांबळे, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Postponement of the Civil disobedience movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.