तालुका कृषी अधिकारी पदाचा तिढा सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:04 IST2021-07-29T04:04:31+5:302021-07-29T04:04:31+5:30

सोयगाव : खरिपाच्या हंगामात सोयगावला कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी मिळतील, अशी अपेक्षा असताना ते पद भरले गेलेच नाही. तर ...

The post of Taluka Agriculture Officer has not been vacated | तालुका कृषी अधिकारी पदाचा तिढा सुटेना

तालुका कृषी अधिकारी पदाचा तिढा सुटेना

सोयगाव : खरिपाच्या हंगामात सोयगावला कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी मिळतील, अशी अपेक्षा असताना ते पद भरले गेलेच नाही. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सोयगावसाठी एक नव्हे तर तब्बल दोन प्रभारींकडे पदभार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामानिमित्त कृषी कार्यालयात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दोन अधिकाऱ्यांना प्रभारी पदभार दिला गेला असून, त्यातील एक जण सोयगावला कार्यरत आहे, तर दुसरे अधिकारी सिल्लोड कृषी कार्यालयात कार्यरत आहेत. सोयगाव कृषी कार्यालयात अधिकाऱ्यांसह बहुतांश पदांवर प्रभारीराज आहे. ग्रामीण भागातही अनेक कृषी सहायकांना दोन्ही मुख्यालयी जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या शोधातच कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे, तसेच आधीच रिक्त पदे असलेल्या या कार्यालयात बदल्यांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत.

Web Title: The post of Taluka Agriculture Officer has not been vacated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.