शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक समितीतर्फे ‘पोस्ट कार्ड चळवळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:04 IST2021-09-23T04:04:21+5:302021-09-23T04:04:21+5:30
कोरोना संक्रमणाच्या भयावह परिस्थितीमुळे दीड वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहेत. काही ठिकाणी आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. ...

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक समितीतर्फे ‘पोस्ट कार्ड चळवळ’
कोरोना संक्रमणाच्या भयावह परिस्थितीमुळे दीड वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहेत. काही ठिकाणी आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. परंतु, अद्यापही अनेक शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा फारसा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत नसून मुलांचे नुकसान होऊ लागले आहे. बाजारपेठा, सभागृहे, सिनेमा हॉल अशी गर्दीची सर्व ठिकाणे सुरू झाली, मग शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यासाठी ‘पोस्ट कार्ड प्रेषण चळवळ’ सुरू केली आहे. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सचिव विजय कोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ सुरू झाली आहे.
220921\img-20210922-wa0019.jpg
शाळा, सुरू करण्यासाठी शिक्षण समिती ने मुख्यमंत्री यांना पोस्ट कार्ड पाठविणार