विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग ; औरंगाबादेत प्राध्यापकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:20 IST2018-03-13T00:19:39+5:302018-03-13T00:20:24+5:30

विद्यार्थिनीच्या व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवून चॅटिंग करणाºया एका प्राध्यापकाला विद्यार्थिनीच्या भावाने काळे फासले. गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही खळबळजनक घटना शहरातील स. भु. वाणिज्य महाविद्यालयात घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या.

Porn chat with the student; Arapangadda professor arrested | विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग ; औरंगाबादेत प्राध्यापकाला अटक

विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग ; औरंगाबादेत प्राध्यापकाला अटक

ठळक मुद्देविद्यार्थिनीच्या भावाने केला पर्दाफाश : स. भु. वाणिज्य महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकाला दाखविला इंगा; कॉल करण्यासाठी आणत होता दबाव

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विद्यार्थिनीच्या व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवून चॅटिंग करणाºया एका प्राध्यापकाला विद्यार्थिनीच्या भावाने काळे फासले. गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही खळबळजनक घटना शहरातील स. भु. वाणिज्य महाविद्यालयात घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या.
प्रा. मनोज बद्रीनारायण जयस्वाल (३८, रा. काचीवाडा, मूळ रा. पानवडोद, ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, छावणीतील रहिवासी तरुणी ही स. भु. महाविद्यालयात बारावीला शिकते. आरोपी मनोज जयस्वाल हा अकाऊंट विषय शिकवतो. गेल्या काही दिवसांपासून त्याची या विद्यार्थिनीवर वाईट नजर आहे. तो सारखं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने तिचा मोबाईल नंबर मिळविला. तेव्हापासून तो तिच्या व्हॉटस् अ‍ॅपवर मेसेज पाठवू लागला. सुरुवातीला अभ्यासाविषयी तो चॅटिंग करीत असे. नंतर मात्र तो खरे रूप दाखवू लागला. तो अश्लील मेसेज पाठवू लागला. ती दाद देत नसल्याने तो ब्लॅकमेल करू लागला. तिने चॅटिंग करावे, तिने त्यास व्हिडिओ कॉलिंग करावे, यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत असे. अकाऊंटसारख्या महत्त्वाच्या विषयाचा तो प्राध्यापक असल्याने ती त्याचे हे उपद्व्याप सहन करीत होती. काही दिवसांपूर्वी तर त्याने तिला व्हिडिओ कॉलिंग करून विवस्त्र होण्यास सांगितले. तिने मात्र त्यास दाद दिली नाही आणि फोन बंद केला. पीडितेच्या भावाला ही बाब समजताच सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याने आणि त्याच्या मित्राने स. भु. कॉलेज गाठले. प्राध्यापकांच्या रूममध्ये मनोज जयस्वाल बसलेला होता. त्यांनी तेथेच त्याच्या तोंडाला काळे फासले. ही घटना समजताच क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अकमल शेख, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव आणि दामिनी पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि प्रा. मनोजला ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Porn chat with the student; Arapangadda professor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.