शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भारुडातून अनिष्ठ रुढीवर प्रहार

By admin | Updated: September 28, 2014 00:09 IST

शरद वाघमारे, नांदेड युवक महोत्सवात भारुडातून मनोरंजन करत विद्यार्थी कलावंतांनी आजच्या प्रश्नांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले़

शरद वाघमारे, नांदेडभारुड कलेच्या माध्यमातून अनिष्ठ रुढी- परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलनासह सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुधारकांकडून पूर्वापार प्रयत्न झालेत़ हा वारसा कायम ठेवत युवक महोत्सवात भारुडातून मनोरंजन करत विद्यार्थी कलावंतांनी आजच्या प्रश्नांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले़स्वारातीम विद्यापीठ व इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात एकाहून एक सरस भारुड सादर झाले़ कंधार येथील शिवाजी कॉलेजच्या संघाने ‘फॅशनने वेड लावलं’ हे भारूड सादर केले़ यात त्यांनी शेतकरी आत्महत्या, फॅशनमुळे तरूणाई कशी बिघडली व आजचे नेते पैशाकडे बघून कसे वेळप्रसंगी पक्ष बदलतात याचा समाचार घेतला़ या भारूडात प्रदीप वाघमारे, सचिन कांबळे, गणेश राठोड, भास्कर, ओमकार, बापूराव बोंबले, शेख जहीर यांनी सहभाग घेतला होता़ औराद शहाजनी येथील दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप याचा वाढता वापर, विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमुळे परीक्षार्थ्यांची घालमेल, निवडणुकीत उमेदवार योग्य द्यावा असा संदेश दिला़ यात कृष्णा पांचाळ, बालाजी तळेगाव, राजकुमार सूर्यवंशी, सिद्राम जाधव, अमोल पांचाळ यांनी सहभाग नोंदवला़ डोळ्यानं दिसतया, बोलाचयं नसतय बया़़़ या भारुडातून श्री दत्त महाविद्यालय, हदगाव येथील विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचारावर प्रहार केला़ तसेच डेंग्यू आजार, शिक्षणाचा घसरता दर्जा आदी विषयावर प्रबोधन केले़ यात आकाश जमदाडे, गजानन शिंदे, ओमकार बरगळ, पवन सदावर्ते, लहू गायकवाड आदींनी सहभाग घेतला़ हु़जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगरच्या विद्यार्थ्यांनी सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला हे भारूड सादर केले़ यात अमोल येटलेवाड, परमेश्वर कऱ्हाळे, प्रमोद हणवते, गंगाधर बोनलेवाड, अविनाश बोंपिलवार आदींनी सहभाग नोंदविला़ यशवंत महाविद्यालयाच्या सोमेश शेलापूरे, किरण सावंत, साईनाथ टाले, गोविंद वाघमारे, विनोद गोडबोले, योगेश गच्चे, विष्णूदा उमाटे यांनी कायम राव बाता हाण्ता अन् म्हणलं तर म्हणता हे निवडणुकीवर प्रकाश टाकणारे भारूड सादर केले़ घरकुल योजना, राजकीय उमेदवारांचे पक्षांतर आदी सामाजिक समस्यांवर फटके मारले़ एकूणच भारूड कला प्रकारातून विद्यार्थ्यांनी प्रचलित सामाजिक प्रथेविरूद्ध परिवर्तनाचे असूड ओढत सामाजिकतेचा जणू संदेशच दिला़‘सहयोग-२०१४’मध्ये रविवारी सकाळी ७ वाजेपासून कलाप्रकारचे सादरीकरण होणार आहे़ यामध्ये वासुदेव, मूकअभिनय , वक्तृत्व, शास्त्रीय गायन, रांगोळी, पोवाडा, जलसा, पोस्टर मेकिंग, शास्त्रीय तालवाद्य, गोंधळ, व्यंगचित्रकला, शास्त्रीय सुरवाद्य, एकांकिका, फोक आर्केस्ट्रा या कलाप्रकारांचा समावेश आहे़ मुख्य मंचासह सहा मंचावर सदरील कार्यक्रम चालणार आहेत़