पालिका पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत !
By Admin | Updated: August 19, 2016 00:59 IST2016-08-19T00:39:27+5:302016-08-19T00:59:20+5:30
भूम : येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्र.४ (इ) मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या आखाड्यातून काँग्रेसचे रोहन जाधव यांनी माघार घेतल्याने आता

पालिका पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत !
भूम : येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्र.४ (इ) मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या आखाड्यातून काँग्रेसचे रोहन जाधव यांनी माघार घेतल्याने आता तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पोटनिवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेस, भाजप व शिवसेनेने सर्वपक्षीय आघाडी करून उमेश माळी यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सागर टकले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसेच काँग्रेसचे रोहन जाधव व रामभाऊ बागडे यांनीही उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे एका जागेसाठी चौरंगी लढत होईल, असे चित्र असतानाच काँग्रेसचे जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, उमेदवारांना शुक्रवारी निवडणूक चिन्ह वाटप केली जाणार आहेत. चिन्ह वाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येईल. नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली असल्याने या पोटनिवडणुकीला महत्व आले आहे. (वार्ताहर)