नळदुर्ग, तुळजापुरात शांततेत मतदान
By Admin | Updated: January 19, 2015 00:56 IST2015-01-19T00:43:28+5:302015-01-19T00:56:24+5:30
उस्मानाबाद : तुळजापूर व नळदुर्ग नगर परिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठी आज दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान झाले. तुळजापूर येथे ७४ टक्के तर नळदुर्ग येथे ५७.५१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नळदुर्ग, तुळजापुरात शांततेत मतदान
उस्मानाबाद : तुळजापूर व नळदुर्ग नगर परिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठी आज दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान झाले. तुळजापूर येथे ७४ टक्के तर नळदुर्ग येथे ५७.५१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तुळजापूर येथील प्रभाग पाचमधील एका सर्वसाधारण जागेसाठी रविवारी मतदान घेण्यातअ ाले. यात ३४६८ पैकी २५६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी काशिनाथ पाटील यांनी दिली. यात सर्वाधिक मतदान पंचायत समिती कार्यालयातील केंद्र क्र. २ मध्ये झाले. येथे ५९५ पैकी ४९२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लघु पाटबंधारे उपविभाग कार्यालयातील केंद्र क्र. ५ मध्ये सर्वात कमी म्हणजेच ५५७ पैकी ३७४ जणांनी मतदान केले. येथील मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात होणार आहे. नळदुर्ग येथे प्रभाग एकमधील रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. यासाठी २५४७ पैकी १४६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात वडारवाडा व वसंतनगर येथील मतदान केंद्रांवर १२६८ पैकी ९२१ तर इंदिरानगर व व्यासनगरसाठी असलेल्या दोन मतदान केंद्रांवर १२७९ पैकी ५३९ जणांनी मतदान केले. काँग्रेसकडून वैभव जाधव तर राष्ट्रवादीकडून निरंजन राठोड यांनीही ही निवडणूक लढविली.
मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजता पालिका कार्यालयात होणार आहे. (प्रतिनिधी)