शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धुमशान पावसाने औरंगाबाद महापालिकेची पोलखोल; प्रशासनाने केला तत्परतेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 16:35 IST

rain in Aurangabad : जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले.

औरंगाबाद : मंगळवारी रात्री औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने ( Aurangabad Municipal Corporation) तत्परता दाखविली नाही. बुधवारी सकाळपासून काही भागांत छोटी-मोठी कामे करण्यात आली. तत्परतेने कामे केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

जेसीबीच्या साह्याने बुढीलेन रस्त्यावरील गाळ काढला. कबाडीपुरा आरोग्य केंद्रात शिरलेले पावसाचे पाणी काढण्यात आले. खाम नदीपात्राच्या परिसरातील गरमपाणी, कोतवालपुरा या वसाहतींतील नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली. चुनाभट्टी पुलावर साचलेली माती, कचरा साफ करण्यात आला. धोबीघाट, फाजलपुरा येथील पुलावरील, टिळकपथ येथील कचरा साफ करण्यात आला. बारूदगरनाला येथील गल्लीत साचलेला कचरा, मृत जनावरे जेसीबीने नेण्यात आली. औषधी भवन रोडवरील कचरा उचलून स्वच्छ करण्यात आला. किराडपुरा, औरंगाबाद टाइम्स कॉलनी या ठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी २ जेसीबी तैनात करण्यात आले. स्वामी विवेकानंदनगर एन-१२ येथील जितेंद्र पाटील, शशिकांत पाटील यांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी शिरले होते. जेटिंग मशीनद्वारे चोकअप काढण्यात आले. सुदर्शननगर येथील दोन घरांच्या तळमजल्यात पाणी शिरले होते. मोटारीने पाणी उपसण्यात आले. हर्सूल भागात फुलेनगर येथे घरांमध्ये शिरलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने पाण्याला वाट मोकळी करून दिली. चेतनानगर भागात पोलीस कॉलनीमध्ये पाणी शिरले होते. ग्रीन व्हॅली, गीतानगर भागातील पाणी काढण्यात आले.

शिवनेरी कॉलनीत येथील पार्वती कन्या विद्यालयाशेजारील भिंत पडली होती. मलबा जेसीबीने उचलण्यात आला. आंबेडकरनगर येथील ग्रीव्हज् कंपनी ते जाधववाडी रस्त्यालगतच्या तीन घरांत शिरलेले पाणी काढण्यात आले. मिसरवाडी येथील सिकंदर कॉलनी, रोशननगर, श्रीकृष्णनगर, सुभेदार रामजीनगर येथील पाणी काढले.चौधरी कॉलनी येथील सावता मंगल कार्यालय, आठवडी बाजारासमोरील पुलावर अडकलेल्या फांद्या, मलबा काढला. हिनानगर, गुलमोहर कॉलनी येथील राजीव गांधी मैदान, चिकलठाणा येथील मुल्ला गल्ली, राजनगर, मुकुंदनगर येथे साचलेले पाणी काढले. वीटखेडा येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत नाल्यात पडली. सातारा परिसरातील कुलकर्णी यांच्या मोकळ्या जागेवरील संरक्षक भिंत पडली. श्रेयनगर येथील शलाखा अपार्टमेंटजवळील पुलालगत पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल, झाडे मलबा साचल्याने नाल्याच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला होता. सुयोग कॉलनी, पानट हॉस्पिटल, गौतमनगर, रोकडिया हनुमान कॉलनी, स्नेहनगर, संकल्प अपार्टमेंट, विष्णूनगर येथील गटारी साफ करण्यात आल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस