पोलिसांची भूमिका संशयास्पद

By Admin | Updated: May 9, 2014 00:33 IST2014-05-09T00:32:27+5:302014-05-09T00:33:15+5:30

नांदेड : हदगाव येथील दिलीप नवघरे (वय ३२) यांनी पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला उद्या १० मे रोजीे एक महिना पूर्ण होत आहे.

The police's role is suspicious | पोलिसांची भूमिका संशयास्पद

पोलिसांची भूमिका संशयास्पद

 नांदेड : हदगाव येथील दिलीप नवघरे (वय ३२) यांनी पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला उद्या १० मे रोजीे एक महिना पूर्ण होत आहे. घटना घडल्यानंतर हदगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवायला १४ दिवस लावले आणि आता १५ दिवस उलटून गेले, आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. एकूणच याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पत्नी सविता हिचे मन्मथ बिडवे नावाच्या शिक्षकासोबत अनैतिक संबंध होते. १० एप्रिल रोजी सविता व मन्मथला ‘नको त्या अवस्थेत’ दिलीपने पाहिले. या बाबीचा मनावर परिणाम होवून दिलीपने त्याच दिवशी विषारी द्रव्य सेवन केले. त्याच दिवशी दिलीपचा मृत्यू झाला. ११ एप्रिल रोजी त्याच्या शवाचे विच्छेदन करण्यात आले. १३ एप्रिल रोजी दिलीपच्या मोटारसायकलच्या डिकीमध्ये एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्याने उपरोक्त बाब नमूद करुन आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट लिहीले. चिठ्ठीतील मजकूर प्रिय आई-वडील, मी माझ्या बायकोचे नायायज संबंध बिडवेसर सोबत माझ्यासमक्ष पाहिले असून, बिडवेसर यांनी आज जेंव्हा माझा व मित्राचा फोन व मोबाईल उचलला नाही व ते स्वत: माझ्या बायकोसोबत मी रंगेहाथ पकडून मी त्यांना मारहाण करत असताना स्वत: माझ्या बायकोने पकडले असून मी त्यांना उद्या बोलूत, असे म्हणताना ते स्वत: पळून गेले आहे. त्यात त्याच्यासोबत माझी बायको तेवढी जबाबदार आहे, म्हणून मी स्वत: त्यांचे बिडवेसर यांची ड्युटी गोर्लेगाव येथे आहे. त्यांना माफ करु नये व त्याच्या सोबत घाण संबंध ठेवणारी माझी बायको सविता हिला जास्तीत जास्त सजा करावी ही नम्र विनंती. बिडवे सर मो. ९४२१०५०१२०. माझे मुलं साभांळ मायं... नवघरे कुटुंबियांची कैफियत चिठ्ठी मिळाल्यानंतर दिलीपच्या नातेवाईकांनी हदगावचे पोलिस निरीक्षक अरुण बस्ते यांची भेट घेतली, मात्र बस्ते यांनी गुन्हा न नोंदवता नवघरे कुटुंबियांची मनधरणी करुन परत पाठविले नवघरे कुटुंबियांनी नंतरही चार ते पाच वेळा पोलिस ठाण्याच्या चकरा मारल्या, मात्र गुन्हा नोंद करण्यात आला नाही कंटाळून नवघरे कुटुंबिय भोकरचे उपाधीक्षक दत्तात्रय कांबळे यांना भेटले, कांबळे यांनी फोन लावून गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला, मात्र पोलिस बधले नाहीत. १८ एप्रिल रोजी पुन्हा नवघरे कुटुंबिय कारवाईच्या मागणीसाठी हदगाव पोलिसात गेले व त्यांनी लेखी तक्रार दिली. ड्युटीवर उपस्थित ठाणेअंमलदार यांनी तक्रार घेतली मात्र पोहोच दिलीच नाही. २४ एप्रिल रोजी नवघरे कुटुंबिय पोलिसांना भेटले २४ रोजी रात्री उशिरा पोलिसांंनी अखेर गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंदवून १५ दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. आरोपींच्या अटकेसाठी लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव, कंधार तालुक्यात पोलिसांची पथके पाठवून शोध घेतला, मात्र आरोपी मिळाले नाहीत. ते अद्यापही फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही- अरुण बस्ते, पोलिस निरीक्षक, हदगाव

Web Title: The police's role is suspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.