ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:06 IST2021-02-26T04:06:17+5:302021-02-26T04:06:17+5:30

पिशोर पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले व सध्या कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल कचरू ...

A policeman died when the wheel of a tractor went off | ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पिशोर पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले व सध्या कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल कचरू वामनराव चव्हाण हे गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच- २० बीव्ही- १२८४) ने कन्नड- औरंगाबाद रस्त्यावरील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. मक्रणपूर पुलाजवळ याच दिशेने जाणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागला. यात ते खाली कोसळले. ट्रॅक्टरचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कन्नड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता चिकलठाण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ट्रॅक्टरचालक सचिन मनोहर भोसले (रा. वडाळी) यास ताब्यात घेण्यात आले आहे. मयत कचरू चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

250221\suresh ramrao chavan_img-20210225-wa0059_1.jpg

कचरु वामनराव चव्हाण

Web Title: A policeman died when the wheel of a tractor went off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.