पोलिसांनी उतरवले संशयाचे भूत...!
By Admin | Updated: December 22, 2015 00:10 IST2015-12-21T23:53:13+5:302015-12-22T00:10:29+5:30
औरंगाबाद : पती-पत्नीतील नाते हे विश्वासावर टिकून असते. या दोघांपैकी एकामध्ये जरी विश्वासाचा धागा तुटला तरी संसाराचा गाडा चालत नाही.

पोलिसांनी उतरवले संशयाचे भूत...!
औरंगाबाद : पती-पत्नीतील नाते हे विश्वासावर टिकून असते. या दोघांपैकी एकामध्ये जरी विश्वासाचा धागा तुटला तरी संसाराचा गाडा चालत नाही. त्यामुळे संसार टिकवायचा असेल तर एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि विश्वास ठेवण्याची जबाबदारी ही दोघांवरही असते. अशाच एका घटनेत ब्ल्यू फिल्ममध्ये दिसणारी महिला ही आपलीच पत्नी आहे, असा समज करून घेतलेल्या नवरोबाच्या मानगुटीवर पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला. ब्ल्यू फिल्मच्या क्लिपिंगमध्ये दिसणारी तूच आहे, असे म्हणत त्याने पत्नीला बदडले. वारंवार सांगूनही पती ऐकत नसल्याने मार टाळण्यासाठी त्या बिचारीने शेवटी आपणच असल्याची खोटी कबुली दिली. मग हे नवरोबा पत्नीला गुन्हेगार ठरविण्यासाठी क्राईम ब्रँचकडे आले. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्या फिल्म पाहून फिल्ममधील महिलेचा आणि या महिलेचा काहीही संबंध नसल्याचे तिच्या पतीला पटवून दिले.
शनिवारी रात्री घडलेल्या या विचित्र घटनेत संशयाचे भूत डोक्यात घुसलेला तरुण हा एक ा खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याची पत्नी शिक्षिका आहे. काही दिवसांपासून त्याला ब्ल्यू फिल्म पाहण्याची सवय लागली. त्याच्याकडील अँड्रॉईड मोबाईलवर कधी मित्राकडून मागवून तर कधी इंटरनेटच्या माध्यमातून पोनोग्राफीच्या साईटस्वरील सेक्स क्लिप तो पाहू लागला. त्याने पाहिलेल्या एका क्लिपमधील स्त्री ही आपलीच पत्नी आहे, असा त्याचा गैरसमज झाला. त्यावरून शनिवारी रात्री पत्नीला मारहाण करण्यास त्याने सुरुवात केली. त्या घाणेरड्या क्लिपशी आपला काहीही संबंध नाही, असे त्या बिचारीने जीव तोडून वारंवार सांगितले. अखेर मार टाळण्यासाठी तिने न केलेला गुन्हा कबूल केला. त्यानंतरही त्याने तिला पुन्हा बेदम मारहाण करीत तू ही फिल्म कोठे बनविली, याची माहिती पोलिसांना दे, असे म्हणून तो तिला घेऊन क्र ाईम ब्रँचमध्ये आला.