‘सीसीटीएनएस’मुळे पोलिस गतिमान

By Admin | Updated: December 20, 2015 23:35 IST2015-12-20T23:28:52+5:302015-12-20T23:35:43+5:30

बालासाहेब काळे, हिंगोली क्राईम क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) ही प्रणाली हिंगोली जिल्ह्यातील १२ ठाण्यांसह १८ युनिटमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे.

Police speeding due to CCTNS | ‘सीसीटीएनएस’मुळे पोलिस गतिमान

‘सीसीटीएनएस’मुळे पोलिस गतिमान

बालासाहेब काळे, हिंगोली
पोलिसांच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी सर्व पोलिस ठाणी आॅनलाईन करण्यासाठी क्राईम क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) ही प्रणाली हिंगोली जिल्ह्यातील १२ ठाण्यांसह १८ युनिटमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९४८ पोलिसांना सीसीटीएनएसचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून त्याला तोंड देण्यासाठी पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे कामकाज आॅनलाईन करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. हिंगोली पोलीस दलात सीसीटीएनएस ही संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी मागील वर्षभरापासून डाटा एन्ट्रीचे काम सुरू होते. या सिस्टीमसाठी लागणारी उपकरणे १२ ठाण्यांसह पोलिस मुख्यालयातील सर्व्हर रूममध्ये बसविण्यात आलेली आहेत. प्रत्येक ठाण्याची संगणकीय माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांना बेसिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रणालीचा वापर करण्यासाठी पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी साधारणत: ९०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. यातील ६०० जणांनी प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित युनिटमध्ये ‘सीसीटीएनएस’चा प्रायोगिक पातळीवर वापर सुरू केला आहे. प्रत्येक २ पोलिस ठाण्यांसाठी एक अभियंता काम पाहणार असून काही महिने तो कर्मचाऱ्यांना सीसीटीएनएसचे संपूर्ण प्रशिक्षण देणार आहे. पोलिसांचे अभिलेख अद्ययावत राहणे व कारकुनी कामात खर्ची होणारे मनुष्यबळ कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरात आणण्याकरिता ही प्रणाली निश्चितच उपयोगी ठरत आहे. गुन्हा दाखल झाल्न्यापासून एफआयआर, जबाब नोंदवणे, चार्जशीट दाखले करणे, मिसींग, वॉन्टेड, फरार आरोपींची माहिती देणे ही कामे संगणकाच्या माध्यमातून होत आहेत. या कामासाठी प्रत्येक ठाण्यातील १ अधिकारी व ५ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून तेच रिसोर्स पर्सन म्हणून काम पाहत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातील एकूण १२ पोलिस ठाणे, ३ उपविभागीय अधिकारी कार्यालये असून मुख्यालयातील पोलिस अधीक्षक व अप्पर अधिक्षकांच्या कार्यालयासह संगणक कक्ष या प्रणालीने जोडण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस दलात ३ उपअधीक्षक, १३ निरीक्षक, १६ सहायक पोलिस निरीक्षक, ४० फौजदार, ८५ सपोउपनि, २४८ हेडकॉन्स्टेबल, २८८ पोलिस नाईक आणि शिपायांची ४४५ पदे मंजूर आहे. यातील अधिकाऱ्यांची काही पदे सध्या रिक्त आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात ३ संगणक, २ प्रिंटर, मॉडेम, जनरेटर, इलेक्ट्रॉनिक पेन, डिजीटल कॅमेरा आदी साहित्य देण्यात आले आहे. ४५० पोलिसांना बेसिक रोल प्रशिक्षणानंतर स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे. सीसीटीएनएसमुळे पोलिसांच्या कामाला गती आली आहे.
अधीक्षकांकडून प्रोत्साहन : रिवार्ड जाहीर
पोलिस दलाचे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी सीसीटीएनएस प्रणालीचा अवलंब केला आहे. जिल्ह्यातील १२ ठाण्यांसह एकूण १८ युनिटचा या प्रकल्पात समावेश केला आहे. सध्या हिंगोली शहर व ग्रामीण, वसमत शहर, कळमनुरी, सेनगाव, बासंबा, आखाडा बाळापूर, गोरेगाव, नर्सी, कुरूंदा, हट्टा ठाण्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
फिर्याद नोंदवण्यापासून चार्जशीट ते गुन्ह्याचा निकाल लागेपर्र्यंतची कामे आॅनलाईन केली जात आहेत. मात्र सदरचे काम संगणकीय कौशल्य असणाऱ्यांनाच जमत असल्याने इतर कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे उत्कृष्ट नोंदी घेणाऱ्यांना प्रत्येकी १ हजाराचे रिवार्ड पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले आहे. यामुळे प्रोत्साहन मिळत आहे.
अशी होत आहेत सर्व कामे....
सीसीटीएनएस प्रणालीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही गुन्हा दाखल झाला तर त्याची माहिती आॅनलाईन मिळणार आहे. या प्रणालीत राज्यातील ९५० पोलिस ठाणी एकमेकांशी जोडली जाणार असून त्यांचे सर्व रेकॉर्ड आॅनलाईन उपलब्ध राहणार आहे. या प्रणालीच्या १०० टक्के यशस्वी अंमलबजावणीनंतर भविष्यात पोलिसांचे कामकाज पेपरलेस होणार आहे. सर्व माहिती आॅनलाईन भरावयाची असल्याने पूर्वीप्रमाणे एफआरआर (प्रथम खबरी अहवाल), लेखी जवाब नोंदवणे, चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया आदी कामे कागदाऐवजी संगणकावरच केली जाणार आहेत.
तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या हातांच्या पंजाचे ठसे घेऊन त्याची माहिती आॅनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रात कुठेही गुन्हा घडला की त्या घटनेतील संबंधित सराईत गुन्हेगार कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी या माहितीचा उपयोग पोलिसांना होणार आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक काम किंवा तपासाची अद्ययावत माहिती घेण्यासाठी संबंधितांकडे जाण्याऐवजी आपल्या कार्यालयात बसून माहिती मिळविण्यास मदत होणार आहे.
विप्रो आणि बीएसएनएलच्या सहकार्याने पोलिस दलाने हा प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे. व्रिपो कंपनीकडून आॅनलाईन जोडण्याब्ाांबत तज्ज्ञांची मदत घेण्यात आली असून बीएनएनएलकडून इंटरनेटची कनेक्टिविटी घेण्यात आली आहे. या कामासाठी ६ संगणक अभियंते नेमण्यात आले आहेत. विप्रो आणि बीएसएनएलच्या सहकार्याने पोलिस दलाने हा प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे. व्रिपो कंपनीकडून आॅनलाईन जोडण्याब्ाांबत तज्ज्ञांची मदत घेतली असून बीएनएनएलकडून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. या कामासाठी ६ संगणक अभियंतेही नेमले आहेत.

Web Title: Police speeding due to CCTNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.