शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

‘मनसे’च्या सभेवर पोलीस ‘राज’; तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:22 IST

बाहेरील जिल्ह्यातून मागवली अतिरिक्त कुमक 

औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरील सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी जवळपास ३ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी (दि. ३०) बाहेरील जिल्ह्यातून अतिरिक्त कुमक दाखल होणार आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम दिला आहे. यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा आयोजित केली आहे. या सभेला विविध पक्ष, संघटनांनी विरोध दर्शविला आहे. काही संघटनांनी सभा उधळून लावण्याचीही धमकी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. पोलीस आयुक्तांनी आढावा घेतल्यानंतर २८ एप्रिल रोजी सभेसाठी सशर्त परवानगी दिली. पोलिसांनी शुक्रवारी आयुक्तालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांची सुरक्षेच्या दृष्टीने असलेली योजना समजावून सांगितली. त्या योजनेनुसारच सभा पुढे गेली पाहिजे, अशा सूचनाही पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

चार ठिकाणी पार्किंग व्यवस्थाराज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी जालना रोडवर ट्राफिक जाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. सभेला येणाऱ्या लोकांच्या गाड्यांसाठी मुख्य पार्किंग ही कर्णपुरा मैदानावर असणार आहे. त्या ठिकाणाहून लोकांना सभास्थळी पोहोचण्यासाठी पक्षाने रिक्षा लावाव्यात, अशा सूचना केल्या आहेत. याशिवाय एम. पी. लॉ, एस. बी. कॉलेजचे मैदान, जिल्हा परिषदेच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था असणार आहे. व्हीआयपी गाड्यांसाठी खडकेश्वर मंदिराच्या समोरची जागा पार्किंगसाठी वापरली जाणार आहे.

बाहेरील जिल्ह्यातून येणार फौजफाटासभेसाठी बाहेरच्या जिल्ह्यातील ५ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३५० पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या ६ तुकड्या येणार आहेत. त्याशिवाय शहरातील दोन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारीही तैनात असणार आहेत.

बंदोबस्त आकडेवारीपोलीस आयुक्त : १उपायुक्त : ८सहायक आयुक्त : १२पोलीस निरीक्षक : ५२एपीआय, पीएसआय : १५६पोलीस कर्मचारी : २०००एसआरपीएफ : ६ तुकड्यात ६०० कर्मचारी

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसMNSमनसे