औरंगाबाद : शहरात अनेक वक्फ मालमत्तांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वक्फ अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. वक्फ मालमत्तांसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीनंतर शनिवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले. क्रांतीचौक येथे वक्फ बोर्डाची ७ एकरपेक्षा अधिक जागा आहे. या जागेवर अगोदरच मोठमोठ्या टुमदार इमारती उभ्या आहेत. क्रांतीचौकात मागील आठवड्यात हरप्रीतसिंग निऱ्ह यांनी ज्युबिली पान सेंटर हटवून जागेचा ताबा घेतला होता. या जागेची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नसताना त्यांनी ताबा घेतला होता. शुक्रवारी आ. इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निऱ्ह यांनी ताबा घेतलेल्या जागेवर जाऊन लोखंडी जाळ्या तोडून टाकल्या. तेथील लोखंडी बोर्डही उखडून फेकला. यावेळी वक्फ अधिकारीही उपस्थित होते. जागेचा ताबा एमआयएमने वक्फ अधिकाऱ्यांना मिळवून दिला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार आ. जलील यांच्यासह दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखलक्रांतीचौक येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून शुक्रवारी एमआयएमचे आ. इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला होता. क्रांतीचौकात वक्फ बोर्डाची ७ एकरांहून अधिक जागा आहे. मुख्य रस्त्यावर वक्फ बोर्डाने काही नागरिकांना भाडे करारावर जागा दिली आहे. या जागेवर मागील आठवड्यात हरप्रीतसिंग निऱ्ह यांनी लोखंडी जाळी लावून ताबा मिळविला होता. या घटनेनंतर शुक्रवारी ‘एमआयएम’ने वक्फ बोर्डाला परत जागेचा ताबा मिळवून दिला होता. त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जागा ताब्यात घेण्यासाठी येथे बळाचा वापर केला. साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी विशेष शाखेचे एस.बी. धुमाळ यांच्या फिर्यादीवरून आ. जलील यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हरप्रीतसिंग निऱ्ह यांच्याविरुद्ध अतिक्रमण करणे आणि जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळविणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
वक्फ मालमत्तांची पोलिसांकडून चौकशी
By admin | Updated: January 17, 2016 00:06 IST