शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

छत्रपती संभाजीनगरात दरोडेखोराचा पोलिसांकडून 'गेम'; असे झालं अमोल खोतकरचे एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:54 IST

बजाजनगर दरोड्यातील मुख्य सूत्रधाराचे पोलिसांकडून ‘एन्काउंटर’; वडगाव कोल्हाटी-साजापूर रस्त्यावर गोळीबाराचा थरार

छत्रपती संभाजीनगर/वाळूज : बजाजनगरमध्ये आर. एल. सेक्टरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर टाकलेल्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव) याचे गुन्हे शाखेने थेट ‘एन्काउंटर’ केले. खांद्यातून छातीत गोळी गेल्याने त्याचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला. वडगाव कोल्हाटी- साजापूर रस्त्यावरील त्याच्या साई लॉजिंग या हॉटेलसमोर सोमवारी मध्यरात्री ११:३० वाजता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अमोलने गोळी झाडली. तेव्हा, पोलिसांनी स्वरक्षणार्थ त्यांच्या शासकीय रिव्हॉल्वरमधून झाडलेल्या गोळीत तो ठार झाला.

१५ मे रोजी लड्डा यांच्या बंगल्यात मध्यरात्री २ ते ४ वाजेदरम्यान ६ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. साडेपाच किलो सोन्याचे दागिने, ३२ किलो चांदी, ७० हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाइल लुटला होता. गुन्हे शाखा व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा दरोडेखोर कारसह कैद झाले होते. तो धागा पकडून पोलिसांनी अमोलसह त्याच्या अन्य पाच साथीदारांना निष्पन्न केले. रविवारी त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, पोलिसांना अमोल सापडत नव्हता.

यांनी रचला दरोड्याचा कट, अमोलचा मृत्यू, पाच अटकेत- मृत अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव)- याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी)- सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबीरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी)- महेंद्र माधव बिडवे (३८, रा. साजापूर)- सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. अंबाजोगाई)- सोहेल जलील शेख (२२, रा. अंबाजोगाई)

असे झाले एन्काउंटर- लुटीतील बहुतांश दागिने अमाेलकडेच असल्याने त्याला नऊ पथके हुडकत होती. मात्र, अमोल कारमधून गावे बदलत फिरत होता. गुन्हे शाखेने गेल्या तीन दिवसांत अमोल वगळता इतर सर्वांना ताब्यात घेतले होते. सोमवारी रात्री अमोल त्याच्या साई गार्डन अँड लॉजिंग येथे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.- वरिष्ठांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवी गच्चे, अंमलदार मनोहर गित्ते, यशवंत गोबाडे, परभत म्हस्के यांच्यासह ११ वाजता लॉजवर गेले. लॉजबाहेरच दरोड्यात वापरलेल्या पांढऱ्या स्विफ्ट डिजायरच्या चालकाच्या सीटवर अमोल, तर मागच्या सीटवर त्याची मैत्रीण हाफिजा अक्तर अली शेख (२७, मूळ रा. पश्चिम बंगाल) बसलेली होती. अमाेलने पोलिसांना पाहताच शिवीगाळ करून गाडी रेस केली. पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने त्यांच्या अंगावर कार घालत कारच्या खिडकीतून पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पोलिसांनी ती चुकवली. मात्र, कारच्या धडकेत अंमलदार गित्ते यांच्या पायाला मोठी जखम झाली. अमाेल दुसरी गोळी झाडण्याच्या तयारीत असतानाच गच्चे यांनी त्यांच्या शासकीय पिस्तुलातून अमोलच्या दिशेने गोळी झाडली.

कार थेट खड्ड्यात जाऊन पडलीअमोलच्या उजव्या खांद्यात गोळी लागताच त्याचा कारवरचा ताबा सुटून कार लाॅजच्या विरुद्ध दिशेच्या खड्ड्यात कोसळली. तोपर्यंत एम. वाळूजचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर पोहोचले होते. त्यांनी धाव घेत अमाेलला बाहेर काढले. त्यांच्याच खासगी वाहनातून ते अमोलला घेऊन घाटीच्या दिशेने निघाले. नगर नाक्यापर्यंत तो पाेलिसांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत अमोलचा मृत्यू झाला होता.

उजवीकडून छातीत जाऊन गाेळी रुतलीगच्चे यांनी झाडलेली गोळी अमाेलच्या उजव्या खांद्याखाली लागली. मात्र, अंतर कमी असल्याने ती उजव्या खांद्यातून छातीत डावीकडे जाऊन रुतली. त्यामुळेच त्याचा काही मिनिटांत मृत्यू झाला.

१४ दिवसांची पोलिस कोठडीअमोलच्या ‘एनकाऊंटर’मुळे लुटलेला ऐवज जप्त करण्याचे पोलिसांचे नियोजन बारगळले. त्यांच्या ताब्यात असलेल्या पाच साथीदारांना मंगळवारी पहाटे ४:३० वाजता पोलिसांनी अटक दाखवली. दुपारी २:३० वाजता निरीक्षक संदीप गुरमे यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. जवळपास २५ मिनिटांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. योगेश, अमोल व सुरेश यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWaluj MIDCवाळूज एमआयडीसी