दोन आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:30 IST2019-03-11T23:30:41+5:302019-03-11T23:30:55+5:30
रांजणगाव शेणपुंजी येथे रविवारी रात्री ६ जणांवर चाकु हल्ला करुन जखमी केल्याप्रकरणी दोघांंना अटक करण्यात आली आहे.

दोन आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे रविवारी रात्री ६ जणांवर चाकु हल्ला करुन जखमी केल्याप्रकरणी दोघांंना अटक करण्यात आली आहे. या दोघा आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोघांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैभव बिराजदार व कृष्णा साबळे या दोघांनी रांजणगाव फाट्यावर शुक्रवारी रात्री शरद दळवी याच्यासोबत भांडण उकरुन मारहाण करण्यास सुरवात केली होती. या भांडणात वैभव बिराजदार याने चाकु काढुन शरद दळवी याच्यावर वार केले होते. यावेळी शरद दळवी याचे मित्र अनिल गवारे, नारायण दळवी, गजाजन कड, अर्जुन बोलसटवाड, शंकर गर्जे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता बिराजदार याने त्यांच्यावर चाकुने वार करुन त्यांना जखमी केले होते. यानंतर घटनास्थळालगत असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर बिराजदार याला पकडून एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
यात जखमी झालेल्या ६ जणांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या अनिल गवारे याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्राणघातक हल्याप्रकरणी आरोपी वैभव बिराजदार (रा.बजाजनगर) व त्याचा साथीदार कृष्णा साबळे (रा.सलामपुरेनगर) या दोघांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.