हल्लेखोर ट्रक चालकाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 20:51 IST2019-06-28T20:51:25+5:302019-06-28T20:51:39+5:30

ट्रक मालक व त्याच्या मित्राला साथीदाराचे मदतीने बेदम मारहाण करणाऱ्या फरार ट्रक चालक अनिल जगताप याला वाळूज पोलिसांनी गुरुवारी मुकुंदवाडी परिसरात जेरबंद केले.

Police detained by the attacker truck driver | हल्लेखोर ट्रक चालकाला पोलीस कोठडी

हल्लेखोर ट्रक चालकाला पोलीस कोठडी

वाळूज महानगर : ट्रक मालक व त्याच्या मित्राला साथीदाराचे मदतीने बेदम मारहाण करणाऱ्या फरार ट्रक चालक अनिल जगताप याला वाळूज पोलिसांनी गुरुवारी मुकुंदवाडी परिसरात जेरबंद केले. शुक्रवारी चालक जगताप याला न्यायालयात हजर केले असता त्यास ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


ट्रकमधील आंबा तसेच डिझेल चोरीच्या तक्रारीवरुन चालक अनिल जगताप व ट्रक मालक हापीज करीम पठाण यांच्यात वाद झाला होता. यातून सोमवारी मध्यरात्री अनिलने भाऊ व अन्य दोन साथीदारांसह हापीज पठाण यास लिंबेजळगावला भेटण्यासाठी बोलावले होते. यानंतर हापीज पठाण याने मित्र रहीम शेख यास सोबत घेतले होते.

यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अनिल जगताप, त्याचा भाऊ व दोन अनोळखी इसमानी ट्रकमालक हापीजवर तलवारीने हल्ला केला होता. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल जगतापला गुरुवारी मुकुंदवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Police detained by the attacker truck driver