शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पोलीस कॉन्स्टेबलने विषारी धुरातून रांगत जाऊन कुटुंबाला वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 18:35 IST

घरातून विषारी धुराचे लोळ बाहेर येत असल्याने आतमध्ये काहीच दिसत नव्हते. 

औरंगाबाद : आग लागलेल्या बंगल्यात कुटुंब अडकल्याचे कळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सय्यद फईम आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तोंडाला रुमाल बांधून अक्षरश: रांगत जाऊन जाधव कुटुंबाला वेळीच बाहेर काढल्याने तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले. 

माहिती कळताच जवाहरनगर ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलीस कर्मचारी सय्यद फईम, रवींद्र गायकवाड, नाईक, वाघचौरे हे अवघ्या ३ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. याच वेळी अग्निशामक दलाची गाडीही दाखल झाली. शिडी लावून अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद फईम गॅलरीत चढले. दारासह खिडक्यांच्या काचा हातोड्याने फोडून त्यांनी आत प्रवेश केला. घरातून विषारी धुराचे लोळ बाहेर येत असल्याने आतमध्ये काहीच दिसत नव्हते. 

सय्यद फईम आणि अन्य जवानाने तोंडाला रुमाल बांधला आणि जीव धोक्यात घालून रांगत रांगत जाऊन जाधव यांची बेडरूम गाठली. तेव्हा बेडवर सविता जाधव तर श्यामसुंदर जमिनीवर, त्यांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडलेले होते. मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी प्रथम श्यामसुंदर यांना बाहेर काढले. त्यानंतर संस्कार, संस्कृती आणि सविता यांना खांद्यावर टाकून शिडीवरून खाली आणले आणि रुग्णालयात हलविले. सविता जाधव यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावलेसविता जाधव यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने शेजारी प्रदीप पाटील कुटुंबाने झटपट अग्निशामक दल, नगरसेवक आणि अन्य शेजाऱ्यांना बोलावून घेतले. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रे आणली. दंडवते कुटुंबाच्या वॉचमनने नळीने आगीवर पाणी मारले. पारस पाटोदी यांनी वीजपुरवठा बंद केला.

लिथेनियम बॅटरी ठरल्या धोकादायकघटनास्थळी सोलार दिव्यांसाठी लागणाऱ्या लिथेनियमच्या आठ बॅटऱ्या होत्या. या बॅटऱ्यांचा आगीमुळे स्फोट झाला. यानंतर पसरलेला धूर अत्यंत विषारी होता. या धुरामुळेच जाधव कुटुंब मृत्यूच्या दाढेत गेल्याची चर्चा घटनास्थळावरील नागरिक करीत होते. शिवाय एलईडी दिवे आणि पुठ्ठ्यांचे शेकडो बॉक्स, इलेक्ट्रिक वायरिंगचे बॉक्स ही आग वाढण्यास कारणीभूत ठरले.

रस्त्यात उभ्या चारचाकींचा अग्निशमन बंबाला अडथळापेट्रोलपंपामागील गल्लीत राहणाऱ्या जाधव कुटुंबाच्या घराला आग लागल्याचे कळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह उल्कानगरीत आले. मात्र गल्लीत उभ्या चारचाकी वाहनांनी मोठा अडथळा निर्माण केला होता. ही वाहने हटविताना सुमारे पंधरा ते वीस मिनिटे गेली. शेवटी जवानांनी पाईप ओढत जाधव यांच्या निवासस्थानापर्यंत नेला आणि आग विझविली. 

गॅलरीचे दार तोडून शिडीवरून सर्वांना काढले बाहेरमदतीसाठी धावलेल्या अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस यांनी धाडसाने जाधव यांच्या बंगल्याच्या गॅलरीपर्यंत शिडी लावली. हातोड्याने गॅलरीतील दार तोडून आत रांगत जाऊन बेशुद्ध पडलेला संस्कार आणि अर्धवट बेशुद्ध पडलेले श्यामसुंदर, सविता आणि संस्कृ ती यांना शिडीवरून खाली आणले आणि अ‍ॅम्ब्युलन्समधून हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी संस्कारला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अन्य तिघांवर तात्काळ उपचार सुरू केले. आणखी १० मिनिटे जरी उपचार मिळण्यास उशीर झाला असता तर त्यांचा अंत झाला असता, असे डॉक्टरांनी सांगितले. 

संस्कारने आजोबाला केला मदतीसाठी कॉलआगीच्या धुराने संपूर्ण घर कवेत घेतल्यानंतर गुदमरलेल्या अवस्थेत झोपेतून उठलेल्या  संस्कारने न घाबरता शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आजोबा शिंदे (सविता यांचे वडील) यांना मोबाईलवरून कॉल केला. आजोबा आमच्या घरात आग लागली आहे, आम्हाला वाचवा, अशी आर्त साद घातली. मात्र दुर्दैवाने संस्कारचा या घटनेत मृत्यू झाल्याने त्याने आजोबाला केलेला हा शेवटचा कॉल ठरला. संस्कार केम्ब्रिज शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. 

अशी लागली आग एलईडी आणि सोलार लाईटच्या भांडारगृहाला आग लागून पसरलेल्या विषारी धुराने गुदमरून १० वर्षांच्या बालकाचा अंत झाला. गुदमरून बेशुद्ध झालेले आई-वडील आणि बहीण खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. ही दुर्दैवी घटना उल्कानगरीमधील खिवंसरा पार्कमध्ये गुरुवारी (दि.२७) पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशामक दल आणि शेजाऱ्यांनी जलद मदत करून सर्वांना तात्काळ रुग्णालयात हलविले. तसेच आगीवर नियंत्रणही मिळविले. संस्कार श्यामसुंदर जाधव (१०) असे मृत बालकाचे नाव आहे.  संस्कारचे वडील श्यामसुंदर बाबासाहेब जाधव (५०), आई सविता  जाधव (४५), मोठी बहीण संस्कृती श्यामसुंदर जाधव (१८) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करंजखेड (ता.पैठण) येथील मूळ रहिवासी श्यामसुंदर जाधव हे एलईडी बल्ब आणि सोलार लाईट विक्र ीचा व्यवसाय घरातूनच आॅनलाईन करतात.  काही वर्षे नाशिक येथे राहिल्यानंतर गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाधव कुटुंब औरंगाबादेतील उल्कानगरीतील बंगला क्रमांक ७५ मध्ये भाड्याने राहण्यास आले. या बंगल्याचे मालक पाठक  हे पुण्याला राहतात. या बंगल्यात तळमजल्यावर चार खोल्या आणि पहिल्या मजल्यावर चार खोल्या आहेत. बंगल्याच्या आवारात आणि आतील खोल्यांमध्ये जाधव यांनी एलईडी आणि सोलार लाईटचा साठा ठेवला आहे. बुधवारी रात्री जेवणानंतर जाधव कुटुंब वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये झोपले. पहाटे ५ वाजेपूर्वी तळमजल्यातील मागील बाजूस ठेवलेल्या मालाला अचानक आग लागली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfireआगPoliceपोलिसDeathमृत्यू