वाहतूक सुधारण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचना
By Admin | Updated: December 17, 2015 00:11 IST2015-12-16T23:57:04+5:302015-12-17T00:11:11+5:30
औरंगाबाद : शहरातील वाहतूक सुधारण्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शपथपत्राद्वारे खंडपीठात २१ प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

वाहतूक सुधारण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचना
औरंगाबाद : शहरातील वाहतूक सुधारण्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शपथपत्राद्वारे खंडपीठात २१ प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.
शहरात चिकलठाणा ते वाळूज औद्योगिक वसाहत या २८ किलोमीटरच्या रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे. झाल्टा फाटा ते महानुभाव चौक या रस्त्याला सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. महानुभाव चौक ते पैठण रोडचे रुंदीकरण व नगर नाका ते दौलताबाद रोड, नगर नाका ते वाळूज रोड या रस्त्यात दुभाजक व स्ट्रीटलाईटची व्यवस्था केली पाहिजे. दौलताबाद रस्त्यावरील दरवाजा अरुंद असल्याने ‘वाहतूक जाम’ची समस्या उद्भवते म्हणून पर्यायी रस्ता आवश्यक आहे. शहरात जालना रस्त्याला पर्यायी रस्त्याची आवश्यकता असून, सिल्लेखाना ते एमजीएम हा रस्ता पूर्ण झाल्यास जालना रस्त्यावरचा ताण कमी होणार आहे. गुलमंडी, पानदरिबा, सराफा, सुपारी हनुमान, कटकटगेट या भागात रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल इ. सूचना आहेत. सुनावणीच्या वेळी महापालिकेतर्फे अॅड. अतुल कराड, आयुक्तांतर्फे अमरजितसिंग गिरासे, रस्ते विकास महामंडळातर्फे अॅड. श्रीकांत अदवंत काम पाहत आहेत.