क्रिकेट स्पर्धेत पोलीस आयुक्तालय संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:32 IST2017-12-29T23:32:34+5:302017-12-29T23:32:51+5:30

एमजीएम मैदानावर शुक्रवारी झालेल्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस आयुक्तालय संघाने प्रिंट मीडिया संघावर ४३ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले.

Police Commissioner of Police, Union Cricket Association, | क्रिकेट स्पर्धेत पोलीस आयुक्तालय संघ अजिंक्य

क्रिकेट स्पर्धेत पोलीस आयुक्तालय संघ अजिंक्य

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर शुक्रवारी झालेल्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस आयुक्तालय संघाने प्रिंट मीडिया संघावर ४३ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले.
पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित एमजीएम येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर व यजमान पोलीस आयुक्तालयाचा संघ सहभागी झाला होता. पोलीस आयुक्तालय संघाने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ६ बाद १२८ धावा ठोकल्या. यात पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी स्फोटक फलंदाजी करताना २७ चेंडूंतच ३ सणसणीत चौकार व एका टोलेजंग षटकारांसह ४० धावांची आकर्षक खेळी केली. असीफ शेखने ९ चौकारांसह ५८ धावांची आक्रमक खेळी केली. प्रत्युत्तरात १२९ धावांचे लक्ष्य घेऊन खेळणारा प्रिंट मीडियाचा संघ २० षटकांत ८५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून दुर्गेश जोशीने १९ व तौसीफने १६ धावा केल्या. पोलीस आयुक्तालय संघाकडून महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बरोरिया यांनी ३ गडी बाद केले. या स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजाचा मान उदयंश यादव याने पटकावला, तर मालिकावीर पोलीस आयुक्त यशस्वी यादव ठरले. दुर्गेश जोशी सर्वोत्तम यष्टिरक्षक ठरला.

Web Title: Police Commissioner of Police, Union Cricket Association,