‘त्या’ ट्रकचालकासह क्लिनरला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:44 IST2019-03-04T22:44:15+5:302019-03-04T22:44:30+5:30

अनेक वाहनांना धडक देऊन एका व्यक्तीला चिरडणारा ट्रकचालक प्रवीण परमेश्वर मोरे आणि क्लिनर अविनाश भास्कर शिंदे या दोघांना सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. साबळे यांनी ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 The police closet with the 'truck driver' with the police closet | ‘त्या’ ट्रकचालकासह क्लिनरला पोलीस कोठडी

‘त्या’ ट्रकचालकासह क्लिनरला पोलीस कोठडी

औरंगाबाद : भरधाव वाहन चालवून अनेक वाहनांना धडक देऊन एका व्यक्तीला चिरडणारा ट्रकचालक प्रवीण परमेश्वर मोरे आणि क्लिनर अविनाश भास्कर शिंदे या दोघांना सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. साबळे यांनी ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


सिल्लोड येथून मका घेऊन निघालेल्या ट्रकने हर्सूल ते चंपा चौकादरम्यान अनेक वाहनांना उडविले. रिक्षासह पाण्याच्या टँकरला धडक दिल्याने दोन्ही वाहने उलटली होती, तर एकाला चिरडले होते. यासंदर्भात सिटी चौक पोलीस ठाण्यासह हर्सूल पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

Web Title:  The police closet with the 'truck driver' with the police closet