हाणामारीच्या गुन्ह्यातील चौघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:58 IST2019-03-25T22:58:42+5:302019-03-25T22:58:53+5:30

दोन गटांत शनिवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटांतील प्रत्येकी सात ते आठ जण जखमी झाले होते.

 Police closet to four gang-rape accused | हाणामारीच्या गुन्ह्यातील चौघांना पोलीस कोठडी

हाणामारीच्या गुन्ह्यातील चौघांना पोलीस कोठडी

औरंगाबाद : दोन गटांत शनिवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटांतील प्रत्येकी सात ते आठ जण जखमी झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटांतील चार जणांना रविवारी रात्री अटक केली. चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.के. देशपांडे यांनी सोमवारी त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


फय्याज बशीर पठाण (३०, रा. बायजीपुरा), फिरोज खान जहूर खान पठाण (२२, रा. गल्ली नं. ३, हुसेन कॉलनी), शेख अमजद ऊर्फ अज्जू शेख खैरू (२७, रा. गल्ली नं. ६, हुसेन कॉलनी) आणि शेख मोहसीन शेख बागवान (२३, रा. त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. सहायक सराकरी वकील बालाजी गवळी यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

Web Title:  Police closet to four gang-rape accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.