पोलिसांच्या बदल्यांना लागला मुहूर्त

By Admin | Updated: June 2, 2014 00:50 IST2014-06-02T00:19:48+5:302014-06-02T00:50:49+5:30

लातूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काहीशा लांबलेल्या अन् जिल्हा पोलिस दलात महिनाभरापासून चर्चेत असलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला़

Police changed the muhurat | पोलिसांच्या बदल्यांना लागला मुहूर्त

पोलिसांच्या बदल्यांना लागला मुहूर्त

 लातूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काहीशा लांबलेल्या अन् जिल्हा पोलिस दलात महिनाभरापासून चर्चेत असलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला़ शनिवारी रात्री उशिरा जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात १९ सहायक पोलिस उपनिरीक्षक व १९३ कर्मचार्‍यांच्या इतरत्र प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत़ जिल्हा पोलिस दलातील वार्षिक सर्वसाधारण बदल्या मे महिन्यात पार पडतात़ त्यानुसार यावेळी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ पोलिस अधीक्षक बी़जी़ गायकर यांनी लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येताच पोलिस दलातील बदल्यांची प्रक्रिया गतिमान केली़ त्यांनी पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरिक्षक पदावरील एकूण २१२ अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत़ गृह विभागाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या बदल्या पार पडल्या़ ज्या पोलिस कर्मचार्‍यांची सध्याच्या ठिकाणी खंडित व अखंडित सहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झालेली आहे, त्यांची तसेच ज्या कर्मचार्‍यांची ते नेमणुकीस असलेल्या तालुक्यामध्ये खंडित, अखंडित बारा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झाली आहे, अशा व ज्यांची नेमणूक मूळ गाव तालुक्यांतर्गत आहे, ज्या कर्मचार्‍यांची स्थानिक गुन्हे शाखेत तीन वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झाली आहे, ज्यांनी बीडीडीएस शाखेत दोन वर्षे कालावधी पूर्ण केला आहे, अशा पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या या प्रक्रियेंतर्गत पार पडल्या आहेत़ या बदल्यांची यादी पोलिस अधीक्षक गायकर यांनी शनिवारी रात्री उशिरा जाहीर केली़ तसेच या संदर्भातचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, पोलिस मुख्यालय, वाहतूक नियंत्रण शाखेला जारी करण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी) बदली झालेल्या १९ सहायक पोलिस उपनिरीक्षकांमध्ये रवींंद्र कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, प्रल्हाद जाधव, सुधाकर जगताप, राजेंद्र पांढरे, शिवाजी सगर, भागवत सूर्यवंशी, उदय हारणे, सोपान भंडे, गोविंद राठोड, मधुकर बिराजदार, व्यंकट चव्हाण, युनूस शेख, गुरूलिंग वाडकर, जनार्दन राजूरकर, देवीदास नाटकरे, विठ्ठल सूर्यवंशी, रोहिदास सोनकांबळे, मोहन कांबळे यांचा समावेश आहे़

Web Title: Police changed the muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.