देशीकट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:29+5:302021-06-09T04:06:29+5:30

मालूंजा येथून एक जण गंगापुरात देशीकट्ट्यासह येत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी मध्य रात्री १ वाजताच्या ...

Police arrested a nationalist | देशीकट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

देशीकट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

मालूंजा येथून एक जण गंगापुरात देशीकट्ट्यासह येत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी मध्य रात्री १ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सापळा रचला. यावेळी महेश काशिनाथ काळे (२३, रा. जामगाव) यास अडवून झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचा कट्टा व काडतूस आढळून आले. महेश यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात विना परवानगी शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कामगिरी पोनि संजय लोहकरे, पोउनि शकील शेख, गुप्तवार्ता शाखेचे योगेश हरणे व रिजवान शेख यांनी पार पाडली.

फोटो : देशीकट्ट्यासह पकडलेला आरोपी.

080621\1835-img-20210608-wa0003.jpg

गंगापूर- विना परवानगी देशी कट्टा बाळगणाऱ्या सह पोनि संजय लोहकरे, पोउनि शकील शेख, योगेश हरणे, रिजवाण शेख

Web Title: Police arrested a nationalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.