‘मसाप’मध्ये काव्यसंध्या बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:00 IST2017-09-08T01:00:32+5:302017-09-08T01:00:32+5:30
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दिवंगत लेखक व कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त काव्यसंध्या आयोजित केली होती.

‘मसाप’मध्ये काव्यसंध्या बहरली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील नामवंत कवींनी लिहिलेल्या कविता अन् गीतकार राजेश सरकटे यांची पेशकश. ‘पाखरा कर शेजारी निवास..’, ‘चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’, ‘कुरवाळुनी करिशी मनधरणी... अशा एकाहून एक सरस काव्य गीतांनी औरंगाबादकरांची काव्यसंध्या बहरली.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दिवंगत लेखक व कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त काव्यसंध्या आयोजित केली होती. यानिमित्त राजेश सरकटे निर्मित ‘चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’ या बी. रघुनाथांसह मराठवाड्यातील नामवंत कवींच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. राजेश सरकटे, डॉ. वैशाली देशमुख आणि संगीता भावसार यांनी कवितांचे गायन केले. कार्यक्रमाची सुरुवात कवी दासू वैद्य यांच्या ‘जगण्याचा पाया चालण्याचे बळ तुकाराम...’ या गीताने झाली. डॉ. वैशाली देशमुख यांनी कवयित्री अनुराधा पाटील यांची ‘उभ्या विनाशी सावल्या...’ ही कविता गायली. ‘पाय पायरीवरी ठेविता...’ ही बी. रघुनाथांची कविता राजेश सरकटे यांनी सादर केली.