छत्रपती संभाजीनगर : पोक्सो, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असताना घाटी रुग्णालयातून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेला आरोपी सोहेल अब्दुल रज्जाक कादरी (२७, रा. विश्रांतीनगर ) शहरात मंगळवारी आजारी आईला भेटायला आला. येताच त्याला अटक करण्यात आली.
फेब्रुवारीपासून तो पसार होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकार यांनी दिली.मे २०२४ मध्ये शहरातील एका अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात घर सोडले होते. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर ती बसलेली असताना आरोपी सोहेलने तिला मदतीचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेले. तिथे तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतरही जवळपास तीन दिवस विविध हॉटेलमध्ये बलात्कार केला. या घटनेमुळे अनेक संघटना, नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने राज्यभरात प्रकरण चर्चेत आले होते. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याचा वारंवार जामीन नाकारण्यात आला. दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसांनी त्याला नियमित तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेले होते. मात्र, तेव्हा त्याने हाताला झटका मारून पोबारा केला. तेव्हापासून सोहेल पसारच होता.
...आणि हातकड्या पडल्यापसार झाल्यापासून सोहेल मुंबईला पळून गेला होता. तिथे तो एका मांस विक्रेत्याकडे नोकरीला होता. मंगळवारी सायंकाळी उशिरा त्याच्या आजारी आईला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी तो शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपनिरीक्षक संदीप काळे, अंमलदार संदीप तायडे, कैलास काकड, विजय निकम, बाळू नागरे यांनी सायंकाळी ६.३० वाजता तत्काळ चंपा चौकात धाव घेत हॉस्पिटल बाहेरच त्याच्या मुसक्या आवळल्या.
शेकडोंचा जमावपोलिसांनी पकडताच सोहेलने अरेरावी केली. हा धिंगाणा पाहून क्षणात शेकडोंचा जमाव जमला. सोहेलचा आत्मविश्वास वाढला व त्याने पोलिसांशी हुज्जत केली. गाडीत बसण्यास नकार दिला. तेव्हा पोलिसांनी अन्य कर्मचाऱ्यांची वाट न पाहता जमावातून वाट काढत पायीच त्याला ठाण्यात नेले.
Web Summary : Accused of POCSO and rape, Sohel Kadri, who escaped from a hospital seven months ago, was arrested in Chhatrapati Sambhajinagar while visiting his sick mother. He had been on the run since February after escaping police custody during a hospital visit.
Web Summary : पॉक्सो और बलात्कार का आरोपी सोहेल कादरी, जो सात महीने पहले अस्पताल से भाग गया था, छत्रपति संभाजीनगर में अपनी बीमार माँ से मिलने के दौरान गिरफ्तार किया गया। वह फरवरी से फरार था जब वह अस्पताल के दौरे के दौरान पुलिस हिरासत से भाग गया था।