निजामकालीन पाझर तलावाची पाळ तोडून प्लॉटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:04 IST2020-12-25T04:04:56+5:302020-12-25T04:04:56+5:30

खुलताबाद : गावालगत असलेल्या शिवारातील सर्वे नंबर एक मधील निजामकालीन पाझर तलावाची पाळ तोडून त्या ठिकाणी प्लॉटींग केली जात ...

Plotting the Nizam-era Pazhar Lake | निजामकालीन पाझर तलावाची पाळ तोडून प्लॉटींग

निजामकालीन पाझर तलावाची पाळ तोडून प्लॉटींग

खुलताबाद : गावालगत असलेल्या शिवारातील सर्वे नंबर एक मधील निजामकालीन पाझर तलावाची पाळ तोडून त्या ठिकाणी प्लॉटींग केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत परिसरातील काही शेतक-यांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन संबंधीत दोषींची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खुलताबाद गावाच्या बादलाबाई शिवारात निजामकालीन पाझर तलाव आहे. या पाझर तलावाची पाळ ही संबंधीत शेतकर्यांच्या सर्वेे नंबर एक मध्ये आहे. काही भूमाफीयांनी भुमी अभिलेख कार्यालयाच्या अधिका-यांना हाताशी धरून संबधीत क्षेत्राची मोजणी करून घेतली. त्यामध्ये पाझर तलावाची पाळ सर्व्हे नंबर ३३,३४ चा समावेश केला आहे. परंतू संबंधीत शेतकर्याकडे १९५२ चा निजामकालीन पाझर तलाव सर्व्हे नंबर एकमध्ये असलेला नकाशा असून त्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. जुन्या रेकॉर्डनुसार निजामकालीन पाझर तलावाची पाळ ही सर्वेनंबर एक मध्येच असून देखील काही प्लॉटींंग करणा-या लोकांनी सदरील पाझर तलावाची पाळ तोडून प्लॉटींग करण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबात प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा शेतकरी सय्यद आबेद पटेल, रूकसाना सय्यद मुक्तार यांनी दिला आहेे.

फोटो कँप्शन : खुलताबाद बादलाबाई शिवारात पाझर तलावाची पाळ तोडण्यात आली आहे.

Web Title: Plotting the Nizam-era Pazhar Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.