करपलेल्या रोपांचे रोपण
By Admin | Updated: July 21, 2014 00:21 IST2014-07-20T23:57:46+5:302014-07-21T00:21:05+5:30
दिनेश गुळवे , बीड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाने तालुक्यातील मसोबा फाटा ते पारगाव दरम्यान शुक्रवारी वृक्षारोपण केले आहे.

करपलेल्या रोपांचे रोपण
दिनेश गुळवे , बीड
येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाने तालुक्यातील मसोबा फाटा ते पारगाव दरम्यान शुक्रवारी वृक्षारोपण केले आहे. वृक्षारोपण करताना अनेक ठिकाणी चक्क जळालेली व सुकलेली रोपेही लावली. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप आहे.
जिल्ह्यात शतकोटी वृक्षलागवड योजना यासह वनविभाग, सामाजिक वनीकरण यांच्याकडून वृक्षारोपणाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. वनक्षेत्र ३३ टक्के असावयास हवे, प्रत्यक्षात बीड जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ तीन टक्क्यांच्याच आसपास आहे. यावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते.
सामाजिक वनीकरण विभागाने मसोबा फाटा ते पारगाव दरम्यान तब्बल पाच हजार रोपांची लागवड केली आहे. रस्त्यालगत दोन्ही बाजूने वृक्षलागवड केल्याच्या नोंदी आहेत. लागवड अधिकारी एम. एन. बनकर म्हणाले की, सुकलेल्या रोपांना पाणी घालण्याचे काम सुरू आहे. ही रोपे चांगली वाढतील.
वृक्षारोपणाची तपासणी करावी
मसोबा फाटा ते पारगाव दरम्यान झालेल्या वृक्षारोपणाची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी वृक्षमित्र सुनील धस, पप्पू पवळ, ज्ञानेश्र्वर गव्हाणे यांनी केली़
पाहणी केली जाईल
या संदर्भात सामाजिक वनीकरण उपसंचालक कुलकर्णी म्हणाले की, ज्या ठिकाणी असे करपलेली रोपे लावल्याचे आढळून आल्यास त्या ठिकाणी नवीन रोपे लावण्यात येतील.