सिडको वाळूज महानगरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:41 IST2019-03-16T23:41:26+5:302019-03-16T23:41:40+5:30
हरित सिडकोचा संकल्प केलेले पर्यावरण प्रेमी पोपट रसाळ व पुजा रसाळ यांच्या हस्ते शुक्रवारी सिडको वाळूज महानगर १ येथे वृक्षारोपन करण्यात आले.

सिडको वाळूज महानगरात वृक्षारोपण
वाळूज महानगर: हरित सिडकोचा संकल्प केलेले पर्यावरण प्रेमी पोपट रसाळ व पुजा रसाळ यांच्या हस्ते शुक्रवारी सिडकोवाळूज महानगर १ येथे वृक्षारोपन करण्यात आले.
सिडको वाळूज महानगर हरित करण्याचा पोपट रसाळ व त्यांच्या टीमने वसा घेतला आहे. लोकसहभागातून सिडको परिसरात आत्तापर्यंत जवळपास नऊ हजार वृक्षाची लागवड केली आहे. विशेष म्हणजे लावलेली झाडे जगविण्यासाठी ठिबक सिंचनही केले आहे. त्यामुळे जवळपास ९० टक्के वृक्ष जगविण्यात त्यांना यश मिळाले आहे.
याच धरतीवर शुक्रवारी सिडकोतील मनजित प्राईड, सिडको उद्यान, महावितरण कार्यालय परिसरात पक्षांना आकर्षन करतील अशी आंबा, चिक्कू, पेरु, आवळा आदी वृक्षाची लागवड केली.