‘वृक्ष लावा, बाळगा अभिमान’

By Admin | Updated: June 6, 2014 01:11 IST2014-06-06T00:48:09+5:302014-06-06T01:11:16+5:30

औरंगाबाद : ‘वृक्ष लावा, बाळगा अभिमान, ठेवा देशाचा मान’, ‘वेळीच करा तपासणी हवा-पाण्याची, नका बाळगू भीती मग प्रदूषणाची’ अशा घोषणा देत सिडकोत पर्यावरण रॅली काढण्यात आली.

'Plant trees, be proud' | ‘वृक्ष लावा, बाळगा अभिमान’

‘वृक्ष लावा, बाळगा अभिमान’

औरंगाबाद : ‘वृक्ष लावा, बाळगा अभिमान, ठेवा देशाचा मान’, ‘वेळीच करा तपासणी हवा-पाण्याची, नका बाळगू भीती मग प्रदूषणाची’ अशा घोषणा देत सिडकोत पर्यावरण रॅली काढण्यात आली.
गरवारे कम्युनिटी सेंटर, गरवारे बाल भवन, एनआयपीएम औरंगाबाद चॅप्टर, एन्व्हायरमेंट रिसर्च अँड एज्युकेशन अकॅडमी, सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली. जागतिक पर्यावरणदिनी सकाळी कॅनॉट प्लेस येथे पर्यावरणप्रेमी जमले होते. यात विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
काहींनी हातात जागतिक पर्यावरण दिनाचा फलक घेतला होता, तर काहींच्या हाती संदेश देणारे फलक होते. एनआयपीएमचे अध्यक्ष मनोज गुप्ता, गरवारे बाल भवनचे संचालक सुनील सुतवणे, मनीषा चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखविला आणि रॅलीला सुरुवात झाली.
यावेळी सर्वांनी पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचा वसा घेतला.
यावेळी पुनीत धिंग्रा, श्रीकांत जोगदंड, सचिन अनर्थे, हर्षवर्धन दीक्षित, दिलीप यार्दी, सुधीर बहिरगावकर, रमाकांत रौतल्ले, शिल्पा अस्वलीकर आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
संदेश माणसांपर्यंत पोहोचवला
‘एक माणूस, एक झाड’, असा संदेश रस्त्यावरील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविला जात होता. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, अशा घोषणा देत रॅली पुढे सरकत होती. रस्त्यावर ये-जा करणारे थांबून रॅली पाहत होते. रॅली जालना रोडवर पोहोचली तेव्हा हॉटेल रामा इंटरनॅशनलचे कर्मचारी रॅलीत सहभागी झाले.

Web Title: 'Plant trees, be proud'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.