फिर्यादी भाऊच निघाला मारेकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:07 IST2017-11-07T00:07:55+5:302017-11-07T00:07:59+5:30

सुशी येथील पती, पत्नी व मुलाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच यातील मृताच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. राजेंद्रनेच जमिनीच्या वादातून बहिण, मेव्हणा व भाच्याचा घातपात करून विहिरीत ढकलुन खून केल्याची फिर्याद मृत महिलेच्या भावाने दिली आहे

 The plaintiff himself killed the brother | फिर्यादी भाऊच निघाला मारेकरी !

फिर्यादी भाऊच निघाला मारेकरी !

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील सुशी येथील पती, पत्नी व मुलाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच यातील मृताच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. राजेंद्रनेच जमिनीच्या वादातून बहिण, मेव्हणा व भाच्याचा घातपात करून विहिरीत ढकलुन खून केल्याची फिर्याद मृत महिलेच्या भावाने दिली आहे. त्यामुळे गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. तालुक्यातील सुशी येथील तुळशीराम पवार, पत्नी जयश्री व मुलगा सुरेश यांचा मृतदेह सुशी शिवारातील विहिरीत आढळून आला होता. याप्रकरणी तुळशीराम यांचा भाऊ राजेंद्र पवार यांच्या माहितीवरून गेवराई ठाण्यात नोंद करण्यात आली होती. याचा तपास सुरू असतानाच फिर्यादी व मृत तुळशीराम पवार यांचा मोठा भाऊ राजेंद्र पवार (३६) याने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने तो बचावला. रुग्णालयातून सुटी होताच त्याने पळ काढला.

Web Title:  The plaintiff himself killed the brother