३०० विद्यार्थ्यांसमोर पिस्तुलचे प्रात्यक्षिक
By Admin | Updated: January 6, 2015 01:06 IST2015-01-06T00:55:26+5:302015-01-06T01:06:37+5:30
जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेच्या वतीने पोेलिस रेझींग डे निमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर

३०० विद्यार्थ्यांसमोर पिस्तुलचे प्रात्यक्षिक
जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेच्या वतीने पोेलिस रेझींग डे निमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर सोमवारी ३०० शालेय विद्यार्थ्यांना स्वत: पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी पिस्तुल चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
सकाळी १० वाजता विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना या मैदानावर एकत्रित आणण्यात आले. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी पिस्तुल चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
पोलिस दलाकडील विविध शस्त्रे, दारूगोळा, श्वान पथकांची माहिती, पोलिस बॅन्ड पथकाची माहिती तसेच बॉम्बशोधक, नाशक पथकाचे साहित्य दाखवून त्याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, विशेष कृती दलाचे सपोनि इज्ज पवार, राखीव पोलिस निरीक्षक परमेश्वर बोर्डे आदी उपस्थित होते.
सदर सप्ताह निमित्ताने ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शहरात गांधी चमन ते शिवाजी पुतळा अशी जिल्हा पोलिस व विविध सेवाभावी नागरी संस्था आणि विद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे.
त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)