शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'PI'च्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, पायावर नाक घासून माफी मागायला लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:21 IST

ट्युशनमधील मुलींच्या वादातून पोलिस निरीक्षकाच्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, जातीवाचक शिवीगाळ करून केले अपमानित

छत्रपती संभाजीनगर : ट्युशनमधील मुलींच्या वादातून पोलिस निरीक्षकाच्या भावाने गुंडांच्या मदतीने दुसऱ्या मुलीच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. काठ्या, लाठ्यांनी हल्ला करत पती-पत्नीला जखमी केले. मुलीच्या आईचे केस पकडून पायावर नाक घासून माफी मागायला लावण्यापर्यंत हल्लेखोरांनी मजल मारली. २२ जुलै रोजी साताऱ्यात घडलेल्या घटनेप्रकरणी संदीप लंके, त्याची पत्नी व अन्य दोन हल्लेखोरांवर सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संदीप लंके एका पोलिस निरीक्षकाचा भाऊ असून, त्यांच्या नावे धमकी देत त्याने हे टोक गाठले.

साताऱ्यात राहणाऱ्या ४५ वर्षीय तक्रारदाराचा नागेश्वरवाडीत गेम झोनचा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी कृतिका (नाव बदलले आहे) व लंकेची मुलगी एकाच ट्यूशनमध्ये शिकतात. काही दिवसांपूर्वी कृतिका व लंकेच्या मुलीत वाद झाले. शिक्षकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र, लंकेच्या मुलीला कृतिकाची माफी मागायला लावल्याच्या कारणावरून संदीपने कृतिकाच्या वडिलांच्या दुकानावर जात कृतिकाला मारण्याची धमकी दिली. तक्रारदाराने समजूत घालून वाद मिटवण्याची विनंती केली. २२ जुलै रोजी रात्री ९:३० वाजता लंके दाम्पत्याने अचानक दोन गुंडांसह लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांसह त्यांचे घर गाठत हल्ला चढवला. लंकेंच्या पत्नीने कृतिकाच्या आईचे केस पकडून ठेवले, तर अन्य तिघांनी कृतिकाच्या वडिलांना घराबाहेर नेले.

संपूर्ण शरीरावर गंभीर वारसर्वांनी मिळून कृतिकाच्या वडिलांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर वार केले. दोघे त्यांना विनवण्या करत होते. हा आरडाओरडा पाहून शेजाऱ्यांनी धाव घेत कृतिकाच्या आईची सुटका केली. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिसांनी धाव घेतली. लंकेने पोलिस अधिकारी असलेल्या भावाच्या नावाने पोलिसांनाही धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पायावर नाक घासायला लावलेकृतिकाच्या वडिलांना घराबाहेर काढल्यानंतर आईला घरात लाथाबुक्क्याने मारहाण केली. केस धरून लंके यांच्या पत्नीच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली. जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. याप्रकरणी हल्लेखोरांवर बीएनएस ३३३ (दुखापत, हल्ला करून घरावर अतिक्रमण), ११८-२ (घातक हत्यारांनी हल्ला), ७४ (विनयभंग), ३०९-६ (जबरी चोरी) सह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजीत पाटील अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस