‘अजिंठ्याच्या’ चित्राने घेतली जागतिक झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:05 IST2021-07-22T04:05:02+5:302021-07-22T04:05:02+5:30
सप्टेंबर २०१७ ते जून २०२१ असे जवळपास ४ वर्षे आवारे यांनी १४८×५१ इंचाचे भव्य पद्मपाणी भगवान बुद्धांचे चित्र ...

‘अजिंठ्याच्या’ चित्राने घेतली जागतिक झेप
सप्टेंबर २०१७ ते जून २०२१ असे जवळपास ४ वर्षे आवारे यांनी १४८×५१ इंचाचे भव्य पद्मपाणी भगवान बुद्धांचे चित्र काढले आहे. काळाच्या ओघात लेणीतील काही चित्र फिकट, लुप्त झाले आहेत. ते चित्र मिळवताना आवारे यांना खूप परिश्रम घ्यावे लागले. त्यासाठी अनेक पुस्तके मिळवावी लागली. कॅनव्हासवर चित्र काढताना महागडे रंग व इतर साहित्यावर हजारो रुपये खर्च झाला. या कामी पत्नी छाया आवारे, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक श्रीकांत मिश्रा यांची त्यांना मदत झाली.
अजिंठ्याच्या लेणीचे सर्व पेंटिंग कॅनव्हासवर पुनरुज्जीवित करण्याचा मानस आवारे यांनी बोलून दाखविला. यापूर्वीही अजिंठा लेणीच्या शोधास २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अजिंठा लेणी येथे देशातील ४३ नामवंत चित्रकारांचे शिबिर भरले होते. त्यानंतर या कलाकारांचे चित्र प्रदर्शन दिल्ली येथे भरले होते. त्यात शिक्षक आवारे यांचा समावेश होता.
फोटो :
210721\img_20210721_185524.jpg
क्याप्शन
याच अजिंठा लेणीच्या चित्राला ' टोर्सो इंडिया' या जागतिक संस्थेचा प्रथम पुरस्कार मिळाला ..सोबत
शिक्षक गजेंद्र श्रीरंग आवारे दिसत आहे.सोबत लोकमत रूरल वर इतर फोटो पाठवले आहे बघावे