शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फिजिओथेरपीमुळे विकलांगांना नवसंजीवनी

By admin | Updated: February 15, 2016 00:19 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड येथील जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी कक्षाद्वारे मोफत भौतिकोपचार (फिजिओथेरपी) उपचार मिळत असल्याने गोरगरीब कुटुंबातील विकलांग रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडयेथील जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी कक्षाद्वारे मोफत भौतिकोपचार (फिजिओथेरपी) उपचार मिळत असल्याने गोरगरीब कुटुंबातील विकलांग रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे. यामध्ये १२ वर्षांखालील मुलांनाही सेवा मिळत असल्याने जन्मत:च विकलांग असलेली मुले चालू लागली आहेत.‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराचा परिणाम जाणवत आहे. आठ महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयात सहा वर्षांचा फैजान नावाचा विकलांग मुलगा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. मेंदूत क्यूचा साठा कमी पडल्याने फैजानला अपंगत्व आले होते. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. हा रुग्ण फिजिओथेरपीसाठी जिल्हा रुग्णालयात आठ महिन्यांपूर्वी दाखल झाला होता. अथक परिश्रम व उपचाराच्या बळावर शनिवारी हा मुलगा आपल्या पायावर चालण्यास सक्षम झाला. जन्मल्यानंतर पहिल्यांदाच फैजान चालत असल्याचे पाहून त्याच्या कुटुंबियांना आनंदाचे भरते आले.जिल्हा रुग्णालयातील डॉ. चव्हाण यांनी आठ महिने फैजानला दिलेल्या उपचार पद्धतीमुळे विकलांग फैजानला चालणे शक्य झाले. जिल्हा रुग्णालयात व्यवसाय उपचार व भौतिक उपचार विभाग उभारल्याने ग्रामीण भागातल्या गोरगरीब रुग्णांना मोफत फिजिओथेरपी सेवा मिळत आहे. खाजगी रुग्णालयात फिजिओथेरपीचा उपचार घ्यायचा म्हटले तर एक ते सव्वालाख रुपये मोजावे लागत होते. शिवाय उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत असे. मात्र, जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या पुढाकाराने फिजिओथेरपी विभाग सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी विभाग सक्षम चालविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, ओ.पी.डी. इन्चार्ज संगीता शिरसाट व कक्षसेवक आशा भासरकर यांचे मोेठे योगदान असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.