वडिलोपार्जित जमिनीचा ताबा देण्याचे हमीपत्र दिल्याने याचिका निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:05 IST2021-07-18T04:05:22+5:302021-07-18T04:05:22+5:30
याचिकाकर्त्यांचे वडील शेख महंमद यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुलांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. म्हणून शेख महंमद यांच्या मुली ...

वडिलोपार्जित जमिनीचा ताबा देण्याचे हमीपत्र दिल्याने याचिका निकाली
याचिकाकर्त्यांचे वडील शेख महंमद यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुलांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. म्हणून शेख महंमद यांच्या मुली न्यामतबी, शायनाबी, खातूनबी व मन्नाबी यांनी वडिलांच्या मिळकतीमध्ये हक्क मिळावा यासाठी पैठणच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. जमिनीत समान हक्क मिळावा, अशी त्यांची मागणी होती. दिवाणी न्यायालयाने मुलींचा दावा १ एप्रिल २०१५ रोजी मंजूर केला होता. त्यानंतर प्रतिवादी भावांनी जिल्हा न्यायालयात केलेले अपीलही फेटाळण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी चौघींनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी, पैठणचे तहसीलदार व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. संबंधित कार्यालयांनी वारंवार टाळाटाळ केल्याने चौघींनी ॲड. ज्ञानेश्वर पवार पाथरेकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करून वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क देण्याच्या आदेशाचे पालन व्हावे, अशी विनंती केली होती. दिवाणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दोन महिन्यांत जमिनीच्या ताब्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे हमीपत्र तहसीलदार व भूमी अभिलेख विभागाकडून खंडपीठात सादर करण्यात आले. त्यावरून खंडपीठाने याचिका निकाली काढली.