पराडा येथे विष पाजून व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 00:21 IST2016-02-22T00:21:57+5:302016-02-22T00:21:57+5:30

जालना /अंबड: प्लॉटिंगमध्ये हस्तक्षेप केल्याच्या कारणावरून एका इसमास विष पाजून जिवे मारण्यात आल्याची घटना पराडा येथे शनिवारी रात्री घडली.

The person's blood in the toxin at the pada | पराडा येथे विष पाजून व्यक्तीचा खून

पराडा येथे विष पाजून व्यक्तीचा खून


जालना /अंबड: प्लॉटिंगमध्ये हस्तक्षेप केल्याच्या कारणावरून एका इसमास विष पाजून जिवे मारण्यात आल्याची घटना पराडा येथे शनिवारी रात्री घडली. दरम्यान आरोपींवर कारवाईसाठी नातेवाईकांनी मृतदेह थेट अंबड पोलीस ठाण्यात आणला होता. गुन्हा दाखल करून कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
अंबड येथील शेख खाजा शेख हकीम (५०) यांना पराडा येथे बोलावून प्लॉटिंगमध्ये हस्तक्षेप का करतो, या कारणावरून नजीर (रा. अंबड), चंदाबाई, साजेदाबाई (रा.पराडा पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांनी संगणमत करून शनिवारी रात्री शेख खाजा यांना बळजबरीने विष पाजल्याची तक्रार केली. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. वरील तिघांनी त्यांना जिवे मारल्याची तक्रार शेख सलिम शे खाजा यांनी अंबड पोलीस ठाण्यात केली. त्यावरून वरील तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे हे करीत असल्याची माहिती ठाण ेअंमलदार राजेंद्र निर्मळ यांनी दिली.

Web Title: The person's blood in the toxin at the pada