शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक होर्डिंगनिहाय दोन हजार रुपये दंड वसूल करण्याची महापालिकेला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:56 IST

मनपाच्या कामगिरीबद्दल खंडपीठाने केले समाधान व्यक्त

ठळक मुद्देदंडाची रक्कम जमा होणार पालिकेच्या खात्यात 

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक बेकायदा होर्डिंगला २ हजार रुपये दंड वसूल करण्याची परवानगी न्या. झेड. ए. हक आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि.५) औरंगाबाद महापालिकेला दिली. ही दंडाची रक्कम पालिकेच्या खात्यात जमा करण्यास खंडपीठाने सांगितले. 

अनधिकृत होर्डिंग लावणारा, प्रकाशक, संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्यास ज्याला शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्याकडून किंवा ज्याने शुभेच्छा दिल्या, त्या व्यक्तीकडून हा दंड वसूल करण्याचे स्पष्ट आदेश खंडपीठाने दिले. महापालिकेने  किती रुपये दंड वसूल केला याची माहिती मनपा आयुक्तांनी शपथपत्राद्वारे पुढील सुनावणी वेळी सादर करण्यास सांगितले. अनधिकृत होर्डिंगचे किती गुन्हे दाखल झाले, पोलीस आयुक्तांनी सद्य:स्थितीचे २ आठवड्यांत शपथपत्र दाखल करावे, असेही खंडपीठाने आदेशित केले आहे. 

खंडपीठाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी शपथपत्र सादर केले. त्यात म्हटल्यानुसार त्यांनी पदभार घेतल्या नंतर तात्काळ विशेष पथक नियुक्त करून अनधिकृत होर्डिंगची माहिती गोळा केली. गुगल अ‍ॅपद्वारे २४०० अनधिकृत होर्डिंगचे स्थान आणि आकार, त्याचा फोटो घेतल्याची तारीख आणि वेळ दर्शविणारी माहिती १५१० पानांच्या ३ व्हॅल्युममध्ये गोळा केली. त्यानंतर ९ झोनमध्ये प्रत्येकी ३ पथके कारवाईसाठी नियुक्त केले. माजी सैनिकांच्या पथकालाही होर्डिंग काढण्याचे अधिकार दिले. त्यांनी ३ मार्च २०२० ला २२८ पोस्टर, ८४ बॅनर, २२ वाढदिवसाच्या  शुभेच्छांचे बॅनर आणि २०० झेंडे काढले. ४ मार्चला १६२ पोस्टर, ८५ बॅनर, २९ शुभेच्छांचे बॅनर आणि ११६ झेंडे काढले. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना झोनचे पालक अधिकारी म्हणून नेमले असून, त्यांच्यावर बेकायदा होर्डिंग काढण्याची जबाबदारी दिली. सुस्वराज्य फाऊंडेशन यांनी अनधिकृत होर्डिंगसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत सर्व महापालिका प्रतिवादी आहेत. औरंगाबाद मनपातर्फे वेळोवेळी अनधिकृत होर्डिंगसंदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयात सादर केली जाते. शपथपत्रे दाखल केली, असेही त्यांनी खंडपीठास सांगितले. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी बाजू मांडली. 

बैठक : फ्लेक्स छपाईस परवानगी हवीमनपा आयुक्तांनी फ्लेक्स आणि प्रिंटिंग प्रेस मालकांची बैठक घेऊन त्यांना मनपा अधिनियम तसेच जाहिरात व फलक नियंत्रण नियमांची माहिती दिली. महापालिका आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतेही फलक तयार करूनये, असे बजावले. फलक तयार करताना प्रकाशनाची तारीख, मालकाचे, प्रकाशकाचे अथवा प्रसिद्धी देणाऱ्याचे पूर्ण नाव आणि पत्त्यासह संपूर्ण तपशील फलकावर लिहिण्याच्या सूचना केल्या. जेणेकरून फलक अनधिकृत असल्यास कारवाई करता येईल. या आदेशाचे पालन न केल्यास अशा फलकांची छपाई करणाऱ्या प्रिंटिंग प्रेसची मान्यता रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे आयुक्तांनी सूचित केल्याचे तसेच अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई महापालिका पुढेही चालू ठेवणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. अनधिकृत होर्डिंगवर दंड लावण्याची तरतूद आहे का, असे खंडपीठाने विचारले असता तशी तरतूद नाही. मात्र, न्यायालयाने आदेश दिल्यास दंड वसूल केला जाऊ शकतो, असे टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ