पाच शाळाखोल्या पाडण्यास मिळाली परवानगी
By Admin | Updated: May 31, 2014 00:30 IST2014-05-30T23:43:55+5:302014-05-31T00:30:21+5:30
हिंगोली : जिल्हा परिषद शाळांच्या मोडकळीस आलेल्या जिल्ह्यातील पाच शाळाखोल्या पाडण्यास मंजुरी देण्यात आली
पाच शाळाखोल्या पाडण्यास मिळाली परवानगी
हिंगोली : जिल्हा परिषद शाळांच्या मोडकळीस आलेल्या जिल्ह्यातील पाच शाळाखोल्या पाडण्यास मंजुरी देण्यात आली असून या ठिकाणी नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम जि. प. कडून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कौठा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची ६ क्रमांकाची खोली तसेच पांगरा शिंदे येथील खोली क्रमांक ७, हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथील खोली क्र.१ , दाटेगाव येथील जि. प. शाळेची खोली क्र. ३ व कळमनुरी तालुक्यातील भोसी जि. प. शाळेची खोली क्र. २ या पाडण्याची विनंती त्या भागातील जिल्हा परिषद सदस्यांनी बांधकाम विभागाकडे केली होती. त्याबाबतचा तांत्रिक अहवाल मागवून घेण्यात आला. या अहवालानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने या शाळाखोल्या पाडण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या जागेवर नवीन शाळाखोल्या बांधण्यात येणार आहेत. दरम्यान, या शिवाय जिल्ह्यातील अन्य १९ शाळांच्या जुन्या इमारती व कोंडवाडा ग्रामपंचायतीची जुनी इमारतही पाडण्यात येणार आहे; परंतु या बाबतचा तांत्रिक अहवाल जिल्हा परिषदेकडे आला नसल्याने त्यावर निर्णय झालेला नाही. या अहवालानंतर सर्वसाधारण सभेची परवानगी घेवूनच या इमारती पाडण्यात येणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) कौठा येथील आरोग्य केंद्राची इमारत पाडणार सेनगाव तालुक्यातील कौठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या ठरावाला नुकतीच जि.प. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेत अहवालपुस्तिकेत मात्र या आरोग्य केंद्राची इमारत १०६२ साली बांधण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. ही प्रिंट मिस्टेक असली तरी अधिकार्यांनी ही पुस्तिका तयार करताना योग्य ती काळजी घेतली नसल्याचे यावरून दिसून येते.