बागेत बहरला बारमाही आंबा !

By Admin | Updated: December 15, 2014 00:44 IST2014-12-15T00:34:49+5:302014-12-15T00:44:02+5:30

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही,

Perennial mango peregrine! | बागेत बहरला बारमाही आंबा !

बागेत बहरला बारमाही आंबा !



लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही, याची काळजी बांधकाम सुरू असतानाच घेतली जाते. काही तुरळक ठिकाणीच घराला लागून बगिचे केले जातात. लातुरातील बोधे नगर भागात एका प्राध्यापकाच्या घरी बारमाही आंबा बहरला आहे. सध्या या आंब्याच्या झाडाला मोहोरही बहरला असून, आंबेही लगडली आहेत. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांतून कुतूहल व्यक्त होत आहे.
लातूर शहरातील बोधे नगर हा भाग नेहमीच गर्दीने फुललेला. परिसरात मोठ मोठ्या इमारतीही आहेत. रहिवाशांची संख्या अधिक असल्याने फारशी मोकळी जागा दिसून येत नाही. या ठिकाणी बोरी येथील कमला नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य बस्वराज करकेली यांचे निवासस्थान आहे. त्यांनी घरासमोरच जवळपास १५ बाय २० च्या जागेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. त्यात पाच वर्षांपूर्वी एक आंब्याचे कलम त्यांनी लावले. सध्या आंब्याचे झाड मोठे झाले आहे. या आंब्याच्या झाडाला बारमाही मोहोर लागत आहे. त्याचबरोबर आंबेही लगडून गेली आहेत. जसजसे आंबे मोठे होतात, तसतसा झाडाला मोहोरही त्याच्या पटीत लागतो. हिवाळ्यात आंब्याचे उत्पादन सहसा कोठेही आढळून येत नाही. क्वचित ठिकाणी किरकोळ प्रमाणात आंबे लगडलेले असतात. इथे मात्र प्रा. करकेली यांच्या दारात बारा महिने आलेल्या पाहुण्यांना आंब्याचे दर्शन होते. कुतूहलाने अनेकजण झाडाच्या लागवडीपासून ते फळ लागेपर्यंतच्या मशागतीची चौकशीही करतात. कोठून तरी आणून लावलेले हे कलमाचे रोपटे आता वृक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)४
दारातच आंब्याचे मोठे वृक्ष आहे. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस आंबे पडतात. मोहोरही बहरल्याचे ठळकपणे दिसते. त्यामुळे काहीजण जाणीवपूर्वक दारात उभे राहून चौकशी करतात. घरात कोणी नसेल तर लहान मुले कुतूहलाने आंबे तोडून घेऊन जातात. अनोळखी लोकांकडून विचारपूस होत असल्याने नव्याने ओळखी वाढल्या आहेत. विचारपूस वाढल्याने नवे मित्रही जोडले गेले असल्याचे प्रा. बस्वराज करकेली यांनी सांगितले.

Web Title: Perennial mango peregrine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.