शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाच्या झाडात फांदीच्या रुपाने नाग अवतरल्याची लोकांची भावना

By admin | Updated: June 29, 2014 00:24 IST

लक्ष्मण तुरेराव, धर्माबाद रावधानोरा बु. ता. उमरी शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडात नागफडा काढल्यासारखे पाच फडे निर्माण झाले. एकप्रकारे फांदीच्या रुपात नाग अवतरल्याची भावना नागरिकांत व्यक्त

लक्ष्मण तुरेराव, धर्माबादरावधानोरा बु. ता. उमरी शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडात नागफडा काढल्यासारखे पाच फडे निर्माण झाले. एकप्रकारे फांदीच्या रुपात नाग अवतरल्याची भावना नागरिकांत व्यक्त होऊन दर्शनासाठी मोठी गर्दी याठिकाणी होत आहे. या शेतात दर सोमवारी भोजनदानही केले जाते. रावधानोरा येथील मारोती कोंडिबा सिद्धेवाड व चपंतराव गोविंदराव सर्जे यांचे शेत आहे. शेतातील धुऱ्यावर छोटेसे लिंबाचे झाड आहे. झाडातून निघालेल्या फांदीत उपरोक्तप्रमाणे प्रकार दिसून आला. मारोती सिद्धेवाड यांना फांदी नागाच्या फडासारखी दिसली. गावातही ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली. झाड पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. काहीजण भक्तिभावाने झाडाचे दर्शन घेवू लागले. दर सोमवारी भोजनदान करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. आठ महिन्यांपासून येथे भोजनदान केले जाते. सात ते आठ क्विंटल तांदळाचे अन्नदान केले जाते. झाडाच्या दर्शनाने इच्छा पूर्ण होते, अशी भावनाही पसरली आहे. (वार्ताहर)लिंबाच्या झाडाखाली वारुळ असून परिसरात नागसाप फिरत असल्याचे सांगितले जाते. २६ जानेवारी २०१४ रोजी दिवसभर साप झाडावर होता, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. त्यामुळे ही जागा नागदेवताची आहे, अशी भावना पसरली. या स्थानाला आता ‘नागदेवता’ देवस्थान असे नाव देण्यात आले. मारोती सिद्धेवाड यांच्या शेतात नागदेवतेचे मंदिर बांधण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोअरही घेण्यात आला.