वीज, पाण्यामुळे जनता झाली त्रस्त

By Admin | Updated: May 12, 2014 00:41 IST2014-05-12T00:14:21+5:302014-05-12T00:41:12+5:30

औरंगाबाद : विभागीय आयुक्तालयाचे ठिकाण असल्यामुळे शहरात भारनियमन करता येत नसले तरी छुप्या भारनियमनातून त्यांची सुटका नाही.

People suffer due to electricity, water | वीज, पाण्यामुळे जनता झाली त्रस्त

वीज, पाण्यामुळे जनता झाली त्रस्त

औरंगाबाद : विभागीय आयुक्तालयाचे ठिकाण असल्यामुळे शहरात भारनियमन करता येत नसले तरी छुप्या भारनियमनातून त्यांची सुटका नाही. शहरातील काही भागात दररोज वीजपुरवठा गायब होतो, तर काही भागात अडीच ते तीन तास वीज नसते. ऐन दुपारच्या वेळी वीज गायब होत असल्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. राज्यात विभागीय आयुक्तालय असलेल्या शहरात भारनियमन केले जात नाही. औरंगाबादेत हाच नियम आहे. शासनाच्या दप्तरी औरंगाबाद शहर भारनियमनमुक्त असले तरी शहरात रोज कोणत्या ना कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित असतो. नियमित बिल भरूनही छुपे भारनियमन सहन करावे लागत आहे. छावणी परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, आमच्या भागात रोज वीजपुरवठा खंडित होत असतो. प्रत्येक वेळी जीटीएल नवनवीन कारणे सांगते. अशीच तक्रार सातारा परिसरातील रहिवाशांनी केली. येथेही दिवसभरात कधीही वीज खंडित होते. राजाबाजार, शहागंज परिसरातील पीठगिरणीचालकांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यापासून वीजपुरवठा कधी खंडित होईल याचा नेम राहिलेला नाही. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत असून ग्राहक कमी होत आहेत. शहरात भारनियमन नसल्याचे सांगितले जाते; पण अनेकदा वीजपुरवठा खंडित का केला जातो? असा प्रश्न औरंगपुर्‍यातील रहिवासी अमित वैष्णव यांनी विचारला आहे. मान्सूनपूर्व कामामुळे पुरवठा खंडित यासंदर्भात जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी सांगितले की, औरंगाबादेत भारनियमन नाही. मात्र, शहरात २ एप्रिलपासून मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. रोज दोन किंवा तीन फिडरवर दुरुस्ती व देखभालीचे काम केले जात आहे. त्यामुळे त्या भागातील वीजपुरवठा बंद केला जातो. अडीच ते तीन तास वीजपुरवठा बंद असतो. आजपर्यंत ८२ फिडरवरील देखभाल, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. यात वाहिन्यांची तपासणी, रोहित्रांची दुरुस्ती, रोहित्रांवरील भार नियंत्रित करणे, इंधन भरण्याचे काम केले जात आहे. अंतिमत: या देखभाल, दुरुस्तीचा फायदा शहरवासीयांनाच होणार आहे. कारण, पावसाळ्यात जोरदार पाऊस आल्यावर तारा तुटणे, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार यामुळे कमी होतील. यासंदर्भात जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी सांगितले की, औरंगाबादेत भारनियमन नाही. मात्र, शहरात २ एप्रिलपासून मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. रोज दोन किंवा तीन फिडरवर दुरुस्ती व देखभालीचे काम केले जात आहे. त्यामुळे त्या भागातील वीजपुरवठा बंद केला जातो. अडीच ते तीन तास वीजपुरवठा बंद असतो. आजपर्यंत ८२ फिडरवरील देखभाल, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. यात वाहिन्यांची तपासणी, रोहित्रांची दुरुस्ती, रोहित्रांवरील भार नियंत्रित करणे, इंधन भरण्याचे काम केले जात आहे. अंतिमत: या देखभाल, दुरुस्तीचा फायदा शहरवासीयांनाच होणार आहे. कारण, पावसाळ्यात जोरदार पाऊस आल्यावर तारा तुटणे, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार यामुळे कमी होतील. पाणीपुरवठा वेळापत्रकाचा मेळ बसविण्याचा प्रयत्न औरंगाबाद : महापालिकेने शहर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची विस्कटलेली घडी बसविण्यास सुरुवात केली आहे. सिडको-हडकोला साडेतीन एमएलडी पाणी वाढवून दिले आहे. ९ मेपासून फारोळा येथे पाण्याचा पुन्हा वापर करून साडेतीन एमएलडी पाणी सिडकोतील वसाहतींसाठी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रक सुरळीत केल्याचा दावा केला असला तरी विजेअभावी अनेक भागांत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. सिडको-हडकोतील काही वॉर्डांना बर्‍याच दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मागील पंधरवडा पाणीटंचाईतच गेला. महापौरांच्या वॉर्डासाठी सेव्हन हिल येथील जलकुंभाजवळ एक्स्प्रेस जलवाहिनीवर दोन व्हॉल्व्ह बसविण्याचे काम अचानक हाती घेण्यात आल्यामुळे सिडको-हडकोतील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला. उपमहापौर संजय जोशी यांनी पाणीपुरवठ्यात येणार्‍या अडचणींचा ७ मे रोजी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेचा जळफळाट झाल्याने खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत ८ मे रोजी सायंकाळी सुभेदारीवर तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली.

Web Title: People suffer due to electricity, water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.