शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

क्षेत्र नसलेल्यांनीही बोंडअळीचे अनुदान लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:36 AM

फुलंब्री तालुका : याद्या बनविताना घोळ; शेकडो शेतकऱ्यांवर अन्याय

रऊफ शेखफुलंब्री : तालुक्यातील शेतक-यांना बोंडअळीचे अनुदान देताना काही शेतकºयांना क्षेत्र वाढवून देण्याचा प्रकार घडला असून यामुळे खºया शेतकºयांवर अन्याय झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तुटपुंजा लाभ मिळालेल्या शेतकºयांनी केली आहे.फुलंब्री तालुक्यात २०१७ मध्ये शेतकºयांनी खरिपाच्या पेरणीत प्रथम प्राधान्य कपाशी पिकाला दिले होते. सुमारे ३५ हजार शेतकºयांनी २६ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केली. पण अचानक बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने निम्मी बोंडे खराब झाली. परिणामी कापसाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. याचा मोठा फटका शेतकºयांना बसला. बोंडअळी नुकसानीबाबत भरपाई मिळावी म्हणून शेतकºयांनी ओरड केली. यानंतर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली. यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांचा समावेश होता.२१ कोटी २७ लाख रुपये मिळालेतालुक्यात ६१ हजार शेतकºयांना बोंडअळीच्या अनुदानापोटी शासनाकडून २१ कोटी २७ लाख रुपये मिळाले होते. हे अनुदान वाटप करताना तलाठीस्तरावर घोळ करण्यात आला. यामुळे खºया शेतकºयांना तुटपुंजे अनुदान मिळाले तर क्षेत्र नसलेल्यांना फुकटचे अनुदान मिळाले.केवळ २५ टक्केच मिळाले अनुदानशासनाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या कपाशी पिकाला अनुदान देताना हात आखडता घेतला. जे नुकसान झाले त्याच्या केवळ २५ टक्केच रक्कम अनुदानापोटी शेतकºयांना देण्यात आली. एका हेक्टरसाठी ६ हजार ८०० रुपये प्रमाणे वाटप करण्यात आले. पण शेतकºयांना एका हेक्टरसाठी लागणारा खर्च सुमारे २८ ते ३० हजार रुपये येतो. असे असताना शासनाने केवळ द्यायचे म्हणून २५ टक्केच अनुदान दिल्याने शेतकºयांत नाराजी पसरली आहे.याद्या तयार करताना दलालाकडून चलाखीयाद्या तयार करताना मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. तलाठी सजांमध्ये असलेल्या दलालांनी याचा फायदा घेत आपल्या जवळच्या लोकांची नावे चुकीच्या पद्धतीने यादीत टाकली. ज्या शेतकºयांकडे कपाशीचे क्षेत्र जास्तीचे आहे, त्यांचे क्षेत्र कमी दाखविण्यात आले तर ज्या शेतकºयाच्या नावे कमी क्षेत्र आहे, त्या शेतकºयांचे क्षेत्र वाढवून दाखविले व अनुदान लाटण्यात आले. अनुदान वाटप करताना याद्या कोणी बनविल्या, याची चौकशी करुन झालेल्या घोळाला जबाबदार असणाºया लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी