शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगरमार्गे छत्रपती संभाजीनगर-पुणे प्रवासात खड्ड्यांमुळे गाडीसह व्यक्तींचा होतोय खुळखुळा

By राम शिनगारे | Updated: October 29, 2025 19:44 IST

ऑन द स्पॉट रिपोर्टिंग: ८ ते १० तासांचा लागतो अवधी : खड्ड्यांमुळे चारचाकी गाड्या चालविणे बनले कठीण

छत्रपती संभाजीनगर : शहारातून अहिल्यानगरमार्गे पुण्याला जात किंवा येत असाल, तर प्रचंड मनस्तापासह गाडी आणि व्यक्तींचा खुळखुळा होत आहे. रस्त्यावरील महाभयंकर खड्ड्यांतून वाट शोधता-शोधता केव्हा गाडी खड्ड्यांत आदळते समजतच नाही. काही ठिकाणी तर ग्राऊंड क्लिअरन्स कमी असलेल्या गाड्या सहजपणे रस्त्याला टेकतात. गाडीचे क्लच, ब्रेक सतत दाबत, कमी करीत गिअरवरचा हात काही बाजूला करताच येत नाही. सतत गाडी आदळत राहते. गाडीची स्पिड २० ते ३० च्या दरम्यानच ठेवावी लागते. काही चालक वाहनांची काळजी न घेताच खड्ड्यांतूनच वाहने वेगात चालविण्याचा प्रयत्न करतात. त्याचा त्रास इतर वाहनचालकांना होतो.

वेग कमी आणि गाड्यांची संख्या जास्त असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी ३ ते ४ किलोमीटरच्या रांगाही लागलेल्या दिसून आल्या. रांगा लागलेल्या असताना तिथे एकही वाहतूक पोलिस नसतो. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या २३५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी जाताना तब्बल १० तासांपर्यंत, तर येताना ८ तासांचा कालावधी लागला. त्यामुळे अनेक प्रवासी केंद्र, राज्य शासनासह यंत्रणेला शिव्यांची लाखोली वाहताना दिसून येतात.

सकाळी साडेसहाला निघाले...पुण्याला जाण्यासाठी ‘लोकमत’चे प्रतिनिधी शहारातील विटखेडा परिसरातून चारचाकीने रविवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता निघाले. नेवासा फाट्यापर्यंत काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे होते. त्यामुळे गाडीला बऱ्या प्रमाणात वेग होता. त्यापुढे नगरपर्यंत प्रचंड खड्डेच खड्डेच दिसून आले. त्यातून गाडी चालविणे अतिशय जीवघेणे होते. खड्डे चुकविणे महाकठीण काम होते. अनेक खड्ड्यांत गाडी घालूनच वर काढावी लागत होती. त्यात गाडी सरळ न चालवता वाकडी-तिकडी घ्यावी लागत होती. हे करताना प्रत्येक वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत होती. अहिल्यानगरला पोहचल्यानंतर बहुतांश वाहचालक ३० किलोमीटरपेक्षा अधिक दूर पडणाऱ्या दौंडमार्गाने पुण्याला जाण्यास प्राधान्य देत होते. दौंडपर्यंत तर संपूर्ण रस्ता सिंमेटचा आहे. मात्र, हा दोन लेनचा रस्ता आणि त्यावर संपूर्ण पुण्याकडील वाहनांची गर्दी वाढल्यामुळे अरणगाव, कोळगाव, काष्टीसह अनेक गावांमध्ये चौकांमध्ये ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या. त्या गावांमध्ये ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलिस उपस्थितीत नव्हते. हीच अवस्था दौंड परिसरात रेल्वे फाटकाजवळ होती. रेल्वेसाठी वाहतूक थांबवली. मात्र, तोपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूंनी ४ किलोमीटरपेक्षा अधिक होत्या. त्यापुढे सोलापूर-पुणे महामार्गाला लागल्यानंतर वखारी, उरुळी कांचन, लोणी काळभाेर या पुण्याबाहेरच्या ठिकाणावर ट्रॅफीकचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढे स्वारगेटला पोहचण्यासाठी सायंकाळचे साडेचार वाजले होते. तब्बल १० तासांहून अधिकचा कालावधी लागला.

पुण्याहून निघाले रात्री ९ वाजता छ. संभाजीनगरात पोहचले पहाटे पाच वाजता‘लोकमत’चे प्रतिनिधी रात्री ९ वाजेच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट परिसरातून छत्रपती संभाजीनगरला निघाले. दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या असल्यामुळे पुण्याला जाणाऱ्या लेनवर वाहनांची तुफान गर्दी होती. मात्र, छ. संभाजीनगरकडे येणाऱ्या लेनवर त्या तुलनेत वाहनांची संख्या कमी होती. वाघोली, लोणीकंद, भिमा कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापूर, शिरूर या ठिकाणच्या जोडरस्त्यांवरील सिग्नलवर ट्रॅफिक जाम असल्याचे दिसून आले. मात्र, तरीही धिम्यागतीने वाहने पुढे सरकत होती. या रस्त्यावर तुलनेने वाहनांची संख्या कमी आणि खड्डे नसल्यामुळे सुपेपर्यंत सदरील प्रतिनिधी १२ वाजेपर्यंत पोहचले. तेथून आहिल्यानगरपर्यंत काही मोठमोठे खड्डे बुजविलेले असल्यामुळे वाहनांची गर्दी नसतानाही वेगात वाहने जात होती. अहिल्यानगरच्या जवळ आल्यानंतर पुन्हा खड्डे सुरू झाले. अहिल्यानगरच्या घाटात तर खड्ड्यांनी कहरच केलेला आहे. दिवसा हे खड्डे दिसत होते. रात्री लाइटच्या उजेडात खड्ड्यांचा अंदाजच येत नव्हता. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि धिम्यागतीने वाहन घ्यावे लागले. त्यामुळे सुपेपासून छत्रपती संभाजीनगरला पोहचण्यासाठी तब्बल ५ तासांचा कालावधी लागला. एकूण रात्री ९ वाजेच्या सुमारास निघालेली चारचाकी पहाटे ५ वाजता आठ तासांनंतर शहरात पोहचली.

प्रवासामुळे आजारीपुण्यात रविवारी नातेवाइकांचा कार्यक्रम होता. जाण्यासाठी १० तास आणि परत येताना आठ तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागला. या प्रवासामुळे आजारीच पडले आहे. एवढा खराब रस्ता आणि त्रासदायक प्रवास आतापर्यंत कधीही पाहिला नव्हता.-ज्योती जाधव, प्रवासी

English
हिंदी सारांश
Web Title : Pothole-Ridden Ahilyanagar Route: Grueling Aurangabad-Pune Travel, Vehicles & People Suffer.

Web Summary : The Aurangabad-Pune route via Ahilyanagar is severely damaged with potholes, causing arduous journeys. Commuters face vehicle damage and delays up to 10 hours due to the road's poor condition and lack of traffic management. The hazardous route is leading to public frustration.
टॅग्स :highwayमहामार्गchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर