...तर दोन कोटींवर आकारणार दंड
By Admin | Updated: March 21, 2016 00:19 IST2016-03-21T00:09:04+5:302016-03-21T00:19:08+5:30
परंडा : अटी व शर्र्थींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील १९ चारा छावण्यांना ‘आपल्यावर दंडात्मंक कारवाई का करु नये’

...तर दोन कोटींवर आकारणार दंड
परंडा : अटी व शर्र्थींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील १९ चारा छावण्यांना ‘आपल्यावर दंडात्मंक कारवाई का करु नये’ अशा स्वरुपाची कारणे दाखवा नोटीस बजावली असून, २३ मार्चपर्यंत योग्य त्या कागदपत्रासह खुलासा सादर न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे.
तालुक्यातील वाकडी, परंडा, चिचंपूर (बु), चिंचपूर(खु), रोहकल, भोंजा, जवळा, कंडारी, लोणी, पांढरेवाडी, सोनारी, तांदूळवाडी, भोत्रा, देवगांव(बु), वाटेफळ, डोंजा, खंडेश्वरवाडी, कौडगाव, आसू /ऐनापूरवाडी या चारा छावण्यांना देयकाची अनुज्ञेयता निश्चित करण्यासाठी व दंडाची रक्कम कपात करण्यासाठीची नोटीस बजावण्यात आली आहे. यात छावणी मंजूर आदेशातील अटी व शर्र्थींचे उल्लंघन झाल्याने दंड आकारण्यात आला आहे. या चालकांवर प्रामुख्याने चाऱ्यात बदल न करणे, धनादेशाव्दारे खर्च करण्यात आलेली रक्कम वाटप न करणे, अभिलेखे अद्ययावत न ठेवणे, विद्युत नसणे, चारा छावणीवर स्वच्छता न ठेवणे, आदी ठपके ठेवण्यात आले आहेत. दंडाची ही रक्कम कपात का करु नये याचा खुलासा योग्य त्या कागदपत्रे, पुराव्यासह उपविभागीय कार्यालय अथवा संबंधित तहसील कार्यालयात २३ मार्चपर्यंत स्वत: अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. पुराव्यासह खुलासा सादर न केल्यास आपले काहीच म्हणने नाही, असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यासबंधीची तंबीही उपविभागीय अधिकाऱ्यांनी या नोटिसीत दिली आहे. (वार्ताहर)