मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड
By | Updated: November 29, 2020 04:07 IST2020-11-29T04:07:56+5:302020-11-29T04:07:56+5:30
हिमाचल प्रदेशात कोरडे हवामान सिमला : हिमाचल प्रदेशात आगामी २४ तासांत कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त ...

मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड
हिमाचल प्रदेशात कोरडे हवामान
सिमला : हिमाचल प्रदेशात आगामी २४ तासांत कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. लाहौल-स्पिती येथे शनिवारी उणे ९.५ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात सर्वांत कमी तापमान येथे होते. मनालीमध्ये शून्य अंश, तर किन्नौरच्या कल्पामध्ये ०.४ अंश तापमान होते. कुफरी येथे ७.७, तर डलहौसी येथे ८.५ तापमान होते.
फोन कंपनीच्या गोदामाला आग
नोएडा (उत्तर प्रदेश) : एका चिनी मोबाईल फोन कंपनीच्या गोदामाला शनिवारी भीषण आग लागली. खूप लांबवरून या आगीचे लोट दिसत होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अनेक बंब बोलाविण्यात आले होते. दुपारी ५ वाजता लागलेल्या या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या बदलाची चर्चा नाही
बंगळुरू : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या बदलाची चर्चा नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांनी शनिवारी सांगितले. अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. मागील तीन ते चार महिन्यांपासून अशा प्रकारची चर्चा सुरू आहे; परंतु त्यात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना
अमरावती : आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी २०२ कोटी रुपयांच्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मूलभूत सुविधांसाठी १४२ कोटी रुपये, तर आंतरिक स्रोतांसाठी ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत.
बिडीवरून केली कामगाराची हत्या
नवी दिल्ली : बिडी देण्यास नकार देणाऱ्या कामगाराची तीन जणांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मृत कामगार पश्चिम बंगालच्या मालदा येथील रहिवासी आहे. हे सर्वजण चांगले मित्र होते. तो एकटा धूम्रपान करीत असताना तिघे जण तेथे पोहोचले व नंतर हाणामारी झाली.
अक्षयऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक
जयपूर : राजस्थानमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रात देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. बी. डी. कल्ला यांनी केले. तिसऱ्या जागतिक न्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टच्या राज्यांच्या सत्राला ते संबोधित करीत होते. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये वर्षातील ३६५ पैकी ३२५ दिवस सूर्याची किरणे उपलब्ध असतात. त्यामुळे येथे सौर व पवन ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आकारास येऊ शकतात.
तीन दिवसांत पावसामुळे ८ ठार
अमरावती : आंध्र प्रदेशात मागील तीन दिवस जोरदार पाऊस होत असून, यात ८ जण ठार झाले आहेत. चित्तूर जिल्ह्यात सहा आणि कडप्पा जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी हवाई पाहणीनंतर तिरुपती येथे स्थितीचा आढावा घेतला.