अर्जदारास माहिती न दिल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:05 IST2021-07-18T04:05:07+5:302021-07-18T04:05:07+5:30
संवंदगाव येथील निवृत्ती रंगनाथ सोनवणे यांनी लघु सिंचन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे माहिती अधिकाराच्या तरतुदीनुसार अर्ज करून ...

अर्जदारास माहिती न दिल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना दंड
संवंदगाव येथील निवृत्ती रंगनाथ सोनवणे यांनी लघु सिंचन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे माहिती अधिकाराच्या तरतुदीनुसार अर्ज करून माहिती मागितली होती. त्यांनी ३० दिवसांच्या आत सोनवणे यांना माहिती देणे बंधनकारक होते. मात्र, त्यांनी मुदतीत माहिती न दिल्यामुळे अधिनियमातील कलम ७ (१) चा भंग झाला. त्यामुळे सोनवणे यांनी राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. आयोगाने दोन्ही जनमाहिती अधिकारी यांना नोटीस बजावली. मात्र, त्यांनी कुठलाही खुलासा केला नाही. त्यामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याचे मत आयोगाने स्पष्ट केले. माहितीच्या अर्जास प्रतिसाद न देणे व माहिती न दिल्यामुळे आयोगाने जनमाहिती अधिकारी तथा लघु सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.