दुचाकीस्वाराच्या धडकेत पादचारी ठार

By | Updated: November 29, 2020 04:07 IST2020-11-29T04:07:27+5:302020-11-29T04:07:27+5:30

रावसाहेब गोविंद खंडागळे हे शनिवारी दुपारी ४ वाजेदरम्यान विठ्ठल आश्रमातून आपल्या घरी पायी निघाले होते. दरम्यान, भोयगाव येथील मोटारसायकलस्वार ...

Pedestrian killed in two-wheeler collision | दुचाकीस्वाराच्या धडकेत पादचारी ठार

दुचाकीस्वाराच्या धडकेत पादचारी ठार

रावसाहेब गोविंद खंडागळे हे शनिवारी दुपारी ४ वाजेदरम्यान विठ्ठल आश्रमातून आपल्या घरी पायी निघाले होते. दरम्यान, भोयगाव येथील मोटारसायकलस्वार हरीचंद्र भागचंद्र भंडारे आपल्या मुलीला नायगाव येथे मोटारसायकलवरुन (क्र. एम एच १४ ए आर ५१९३) या मार्गावरूनच घेऊन जात होते. त्यादरम्यान हा अपघात झाला. अपघात होताच उपस्थितांनी त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत

सध्या देवगाव - टोका व वैजापूर - करमाड या रस्त्याचे काम सुरू आहे. गंगापूर शहरात रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी छोटे-मोठे अपघात घडत आहेत. रस्त्याची एक बाजू दुरुस्त करून तो सुरू करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: Pedestrian killed in two-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.