शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इकडे लक्ष द्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारीच राहणार ईद-ए-मिलादची सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 17:38 IST

ईद ए मिलादच्या सार्वजनिक सुटीसाठी मुंबईपुरताच बदल करण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगर: राज्यात सोमवार दि.१६ रोजी जाहीर केलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी कायम ठेवावी अथवा रद्द करावी व त्याबदल्यात दि.१८ रोजी सुटी जाहीर करावी किंवा कसे याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा अशी अधिसुचना शासनाने जारी केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड  तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन जिल्ह्यात सोमवार दि.१६ रोजी असलेली सुटी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद सण एकामागोमाग एक असल्याने दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सौहार्द रहावे यासाठी ईद ए मिलादची सार्वजनिक सुटी सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ ऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ रोजी देण्यात आली आहे. हा बदल मुंबईपुरताच मर्यादित असला तरी उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन सुट्टी बदलाचा निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड  तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन जिल्ह्यात सोमवारची सुटी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात १४ सप्टेंबर दूसरा शनिवार, १५ सप्टेंबर रविवार आणि १६ सप्टेंबर ईद-ए-मिलाद अशा सलग सुट्या लागू असणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादEid e miladईद ए मिलाद